E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
लातूर पोलिसांवर पळशीत हल्ला; सहा जण जखमी
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पथकाला मारहाण
हिंगोली : वसमत तालुक्यातील पळशी येथे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.
लातूर जिल्ह्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात पळशी येथील एका आरोपीचा सहभाग असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह सहा कर्मचारी आरोपीला अटक करण्यासाठी पहाटे दोनच्या सुमारास पळशी येथे आले होते. लातूर पोलिसांचे पथक आल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या नऊ जणांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. लाकडी दांडा आणि लोखंडी रॉडने पोलिसांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांच्यासह सहा कर्मचारी जखमी झाले. घटनेनंतर संबंधित नऊ जण घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांच्यासह जमादार कृष्णा चव्हाण, अविनाश राठोड, शिवा पतंगे, संदीप चव्हाण, गणेश सूर्यवंशी आणि भारशंकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पोलिसांना तातडीने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर लातूर पोलिसांचे पथक रवाना झाले.
या प्रकरणी सुदर्शन शिंदे, राजू शिंदे, विकी शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना पकडण्यासाठी हिंगोली पोलिसांची तीन पथके रवाना झाली असून, पुढील तपास सुरू आहे.
Related
Articles
शेअर बाजारात किरकोळ वाढ
05 Nov 2026
शेख हसीना यांना सोपवा ; कायदा मंत्र्याची मागणी
09 Nov 2026
बोनसच्या यादीतून ६० कर्मचारी वगळले
11 Nov 2026
राजस्तानमध्ये नागौर फटाका गोदामात भीषण स्फोट ; दोघांचा मृत्यू
05 Nov 2026
दिवाळीच्या सुट्टीत बालचमूंचा गड-किल्ले उभारण्याचा उत्साह
07 Nov 2026
गोकुळसाठी व्याकुळ, कायदाच बदलला!
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)