E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
जिल्हा बँक निवडणुकीची बिनविरोधची शक्यता मावळली
Samruddhi Dhayagude
30 Oct 2026
मोहिते-पाटलांची राजकीय जादू चालणार का?
सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (डीसीसी) निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न आता अडचणीत आले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी केलेल्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता मोहिते-पाटील कुटुंबीयांनी थेट निवडणुकीच्या मैदानात लक्ष घातल्याचे चित्र आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून भेटीगाठींचे सत्र सुरू झाले असून, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वक्तव्यानेही बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
परिचारकांशी भेट
माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूर येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावी नेत्यांना सोबत घेऊन निवडणुकीची गणिते जुळवण्याचा मोहिते-पाटील गटाचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेण्याची भूमिका मांडली होती. शेतकर्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकत्रीकरणाची भूमिका त्यांनी मांडल्याने या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाची रणनीती काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
डीसीसी बँकेची गडबड सुरू : धैर्यशील मोहिते-पाटील
उजनी धरणावरील प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील वांगी येथे आयोजित बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा उल्लेख केला. बैठकीला उशीर होण्यामागे डीसीसी बँकेच्या निवडणुकीची गडबड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांनी बँकेच्या निवडणुकीला किती गांभीर्याने घेतले आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. आपण स्वतः मोहिते-पाटील यांना फोन केला होता; मात्र त्यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचा दावा कल्याणशेट्टी यांनी केला. बँकेच्या कारभारावरूनही त्यांनी मोहिते-पाटील कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांमध्ये राजकीय मतभेद आडवे येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मोहिते पाटील गटाकडून अर्जांची खरेदी
जिल्हा बँकेच्या १९ संचालकपदांसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ४७ दुग्ध संस्थांचा समावेश झाल्याने एकूण मतदारसंख्या २,५९६ झाली आहे. त्यामुळे माढा, पंढरपूर आणि सांगोला परिसरातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, माजी आमदार राजन पाटील यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतरही अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी अर्ज खरेदी केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील घराण्याला सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव आणि राजकीय प्रभाव लाभला आहे. मात्र, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. बँकेच्या निवडणुकीत विविध गटांचे हितसंबंध, पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक नेत्यांची ताकद यांचा कस लागणार आहे.राजन पाटील यांच्या बिनविरोधाच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळणार का, सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधाला मोहिते-पाटील कसे प्रत्युत्तर देणार आणि रणजितसिंह मोहिते-पाटील जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र आणण्यात कितपत यशस्वी होणार, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
मोहिते-पाटील कुटुंबीयांनी आता थेट लक्ष घातल्याने डीसीसी बँकेची निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही; तर सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील वर्चस्वाची चाचणी ठरण्याची चिन्हे आहेत. बिनविरोधाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असे म्हणणे घाईचे ठरेल; मात्र सध्याच्या घडामोडींमुळे तो अधिक कठीण बनला आहे. आगामी काळात मोहिते-पाटील कोणती राजकीय खेळी करतात आणि त्यातून कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल
03 Nov 2026
डीसीसी बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांना उशिरा शहाणपण सुचले
06 Nov 2026
महापालिकेच्या आठ शाळा होणार सीबीएसई
06 Nov 2026
तामिळनाडूच्या चार मच्छीमारांचे मृतदेह आंध्र प्रदेशात आढळले
06 Nov 2026
सोमालियाजवळ मासेमारी नौकेची समुद्र चाच्यांच्या तावडीतून सुटका
04 Nov 2026
राष्ट्रवादी अजित पवार गटात दुफळी...!
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित