E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मोबदला नको; पण वृक्षतोड थांबवा
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
भाग १
संजय ऐलवाड
कर्जत : जंगल म्हणजे केवळ झाडांचा समूह नाही, तर आमचे घर, आमची संस्कृती, आमच्या जगण्याचा आधार आणि पूर्वजांकडून मिळालेला वारसा आहे. याच जंगलाने आम्हाला अन्न दिले, औषधी वनस्पती दिल्या, जगण्याची दिशा दिली. याच जंगलाच्या सान्निध्यात आमच्या पिढ्या वाढल्या. विकासाच्या नावाखाली आमच्यापासून आमचे जंगलच हिरावून घेतले जाणार असेल, तर आम्ही जगायचे कसे? असा हृदयाला भिडणारा आर्त सवाल करत ज्यांच्यावर जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी आहे, तेच जंगलाचे भक्षण करीत असल्याचा आरोप कर्जत तालुक्यातील कोथलखलाटी परिसरातील आदिवासी ग्रामस्थांनी केला.
आदिवासी आणि जंगल यांचे नाते केवळ उपजीविकेपुरते मर्यादित नाही. जंगल त्यांच्या जीवनपद्धतीचा, परंपरांचा, संस्कृतीचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाच्या या सहजीवनातूनच त्यांच्या जगण्याची पद्धत विकसित झाली आहे. मात्र, याच जंगलात विद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड होत असल्याने या नात्याला तडा जाण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे. टोरेंट कंपनीच्या विद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत या परिसरातील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. कोसळलेल्या झाडांना पाहून हे आदिवासी ग्रामस्थ भावूक होऊन त्या त्या झाडाविषयींच्या आठवणी सांगत आहेत.
आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणावत आहेत. भावूक झालेले ग्रामस्थ मध्येच आक्रमक होऊन वृक्षतोड थांबवून जंगलाचे संरक्षण करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आहेत.आदिवासी ग्रामस्थांच्या दृष्टीने झाड तोडले जाणे म्हणजे केवळ एक वृक्ष कमी होणे नव्हे, तर त्यांच्या जीवनाशी जोडलेला एक दुवा तुटणे आहे. जंगल उजाड झाले, तर केवळ हिरवाई नष्ट होणार नाही; तर पिढ्या न पिढ्या जपलेले ज्ञान, परंपरा आणि निसर्गाशी असलेले सहजीवन धोक्यात येईल, ही भीती त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट जाणवत आहे. या परिसरातील नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर ग्रामस्थ पारंपरिक उपचारांसाठी करीत आले आहेत. वृक्षतोडीमुळे या वनस्पती नष्ट झाल्या, तर हे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणेही कठीण होईल, अशी चिंता ते तळमळीने व्यक्त करीत आहेत. वृक्षतोडीची बातमी सर्वत्र वेगाने पसरल्यानंतर राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने या परिसरात दाखल होत आहेत. ते कंपनी व सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. ज्या-ज्या ठिकाणी झाडे तोडली त्या ठिकाणी झाडे जगविण्याचा संदेश देणारे फलक लावले आहेत. तर काही नागरिकांनी या भागात रोपटे लावून या कृतीचा निषेध करत आहेत. वृक्षतोडीचे चित्र पाहून अनेक पर्यावरणप्रेमी आक्रमक होत आहेत. त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आमचे जंगल वाचवा. आमची औषधी वनस्पती वाचवा. आमच्या पुढच्या पिढ्यांना या निसर्गापासून दूर करू नका. आम्हाला आमच्या परंपरेनुसार आणि आमच्या पद्धतीने जगू द्या. आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, तर आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तूर्तास वृक्षतोड थांबली
दसर्याच्या दिवशीपासून पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेतला. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलने केली. त्यामुळे तुर्तास तरी या भागातील वृक्षतोड थांबली आहे. मात्र, पुन्हा वृक्षतोड सुरू होऊ शकते, अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. वृक्षतोडीला ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांनी विरोध न थांबविल्यास पोलिस बंदोबस्तात वृक्षतोड होऊ शकते, अशी भीतीही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
वन्यजिवांचा अधिवास धोक्यात
विद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत हजारो झाडे तोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आणखी हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता ते वर्तवीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पक्षी, प्राणी आणि कीटकांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम झाला आहे. जंगल हे या जिवांचेही घर आहे. झाडे नाहीशी झाली, तर त्यांच्या अन्नसाखळीवर, निवार्यावर आणि प्रजननाच्या नैसर्गिक ठिकाणांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही ग्रामस्त व्यक्त करत आहेत.
आमच्या जीवनात हस्तक्षेप करू नका
आम्हाला सरकारकडून किंवा कंपनीकडून आर्थिक मदत नको. कोणत्याही सुविधांचे आश्वासन नको. आमचे जंगलच सुरक्षित राहिले नाही, तर या मदतीचा आम्हाला काय उपयोग? आजूबाजूच्या निसर्गातच आमचे जगणे आहे. आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. आमच्या जीवनात हस्तक्षेप करू नका आणि आमच्या जंगलाचे अस्तित्व मिटवू नका, अशी भूमिका ग्रामस्थ मांडत आहेत. त्यांच्या या मागणीमागे केवळ प्रकल्पाला विरोध नाही, तर पारंपरिक जीवन, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची धडपड असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Related
Articles
अल्काराझची रुडवर मात
09 Nov 2026
भगवंत मान यांच्या तोंडाला दारूचा वास यायचा : राहुल
05 Nov 2026
मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडणे गरजेचे
08 Nov 2026
गोदावरी खोर्यात पाणी उपलब्धतेसाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य : विखे
04 Nov 2026
७३ लाख दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात ५ हजाराची मदत जमा
05 Nov 2026
महमद शमी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित