टिमविच्या ग्रंथालयात ‘वाचू आनंदे’ कार्यक्रम उत्साहात   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालय विभाग आणि फिजिओथेरपी विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘वाचू आनंदे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून व्हीआयटी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या डॉ. प्रितम मरळ उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले. व्याख्यात्यांचे स्वागत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ. स्वाती मते यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार सुजाता हरगुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय विभागातील संपूर्ण कर्मचारीवृंदाने सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे आणि वाचनाची गोडी निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Related Articles