टिमविच्या ग्रंथालयात श्री सरस्वती पूजन   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने श्री सरस्वती पूजनाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन करण्यात आले.यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ न्यासाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, सचिव अजित खाडिलकर, विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.विद्या, ज्ञान आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या देवी सरस्वतीचे पूजन करून शैक्षणिक कार्यात ज्ञानाची उपासना व वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यानिमित्ताने ग्रंथालय विभागात आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेषतः ‘ज्ञानवटवृक्ष’ या संकल्पनेवर आधारित सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. स्वाती मते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयातील सर्व कर्मचार्‍यांनी उत्साहाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles