E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
नवीन तंत्रज्ञान शिकले तरच ’जेन झी’चा टिकाव लागेल
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
पुणे
: मागील काही वर्षात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. भारत म्हणून आपण क्वांटम तंत्रज्ञानामध्ये काही प्रमाणात मागे आहोत. पण येत्या काळात या तंत्रज्ञानावर भर दिल्यास आपला वेगाने विकास होईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आंतरविद्याशाखीय अभ्यास होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे सल्लागार व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये ‘डवान्सेस इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नातू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अलिकॉन ग्रुपचे स्ट्रॅटेजिक बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख हर्षवर्धन गुणे, एज्युलॅब ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक केन यानागिनोउची, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक राजेंद्र कडूसकर, माजी अध्यक्ष व संचालक सुनील रेडेकर, इंजिनिअरींग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदिप पाटील व परिषदेचे संयोजक डॉ. रविंद्र एदलाबादकर व डॉ. मनमोहन भूमकर उपस्थित होते.
डॉ. अरविंद नातू म्हणाले, जनरेशन झीने नव्याने येणारे तंत्रज्ञान आत्मसात करायलाच हवे, नाहीतर त्यांचा टिकाव लागणे अवघड होईल. आता इंडस्ट्री 5.0 वेगाने विकसित होत असून, ती मानवकेंद्रित आहे. एआय आल्यामुळे अनेकांच्या नोकर्या जातील, कौटुंबिक आयुष्य खराब होईल असे बोलले जात होते. हे काही प्रमाणात खरे असले तरी आपण या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतले तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो.
राजेंद्र कडूसकर यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय परिषदेमागची भूमिका स्पष्ट केली. सुनील रेडेकर यांनी पुणे विद्यार्थी गृहाच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. संदिप पाटील यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत विस्ताराने माहिती दिली. परिषदेसाठी निवड झालेल्या 156 संशोधन प्रकल्पांच्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. दुसर्या सत्रात हर्षवर्धन गुणे व केन यानागिनोउची यांनी उपस्थितांशी संवाद साधला. डॉ. मधुरा महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. मनमोहन भूमकर यांनी आभार व्यक्त केले.
Related
Articles
वाहनावरील दंडाच्या थकबाकी वसुलीसाठी सरकारची अभय योजना
05 Nov 2026
शेतकर्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरावे : राजू शेट्टी
09 Nov 2026
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा
07 Nov 2026
७३ लाख दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात ५ हजाराची मदत जमा
05 Nov 2026
हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळला पर्वती परिसर
07 Nov 2026
शेवगाव तालुक्यात ३५ गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)