E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
अवैध धंद्यावर पोलिसांचे ’ऑल आऊट ऑपरेशन’
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
जुगार, अमली पदार्थासह अवैध दारूचे 19 गुन्हे दाखल
पुणे
: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासह अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार 28 ऑक्टोबर रोजी परिमंडळ सातच्या हद्दीत अचानक ’ऑल आऊट’ आणि ’कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेत जुगार, अमली पदार्थांची विक्री, अवैध दारू आणि देहविक्री व्यवसायाविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परिमंडळ सातमधील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या विशेष मोहिमेदरम्यान अवैध जुगारप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अमली पदार्थविरोधी कारवाईत एनडीपीएस कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत 24 हजार रुपये किमतीचा 265 ग्रॅम गांजा आणि पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला. या दोन्हींची एकत्रित किंमत पाच लाख 24 हजार रुपये आहे.
अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाईत तब्बल 19 गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत 33 हजार 675 रुपये किमतीची 10 लिटर गावठी तसेच देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. याशिवाय 20 जणांना कयदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव शेरी येथील हॉटेल छावा एक्झिक्युटिव्हमध्ये अवैध देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली, तर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून 16 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान परिमंडळ सातमधील अभिलेखावरील आरोपींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. तसेच नाकाबंदी करून 248 वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या सहा वाहनांवर कारवाई करून पाच हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंदे चालविणार्यांवर वचक निर्माण करण्यासाठी अशा अचानक मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिमंडळ सातच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Related
Articles
दीपोत्सवाचा संदेश (अग्रलेख)
09 Nov 2026
दुसरी ते आठवीच्या संकलित मूल्यमापन चाचणी-2 परीक्षेचे वेळापत्रक बदलले
09 Nov 2026
‘एक देश, एक निवडणुकी’वरून काँग्रेस पुन्हा आक्रमक
05 Nov 2026
एनव्हिडियाच्या सीईओचे चिनी हेरासोबत संबंध
11 Nov 2026
१२ नोव्हेंबरपासून पंढरपुरात भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय सुरू
11 Nov 2026
बावधनमध्ये खंडीत वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)