E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढणार
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
पुणे
: पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. शाळांमध्ये अतिरिक्त कॅमेरे बसविण्यासह त्यासाठी आवश्यक विद्युत व नेटवर्क यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे एक कोटी 99 लाख 55 हजार रुपये खर्च अपेक्षित असून, आयसीक्यूआर आयटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा स्वीकारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. या कामासाठी आठ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्युत विभागाने पूर्वगणनपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी तीन निविदाधारक पात्र ठरले, तर एक निविदा अपात्र ठरली.पात्र निविदाधारकांमध्ये आयसिक्युअर आयटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.22 टक्के कमी दराने निविदा सादर केली. तर जे. डी. एंटरप्रायझेस आणि निखिल नेटवर्क्स यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा सादर केल्या. त्यामुळे सर्वांत कमी दराची निविदा सादर करणार्या आयसिक्युअर आयटी कंपनीची निविदा स्वीकारण्याची शिफारस विद्युत विभागाने केली आहे.
या कामासाठी जीएसटीसह एक कोटी 99 लाख 55 हजार 637 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर यंत्रणा, कॉपर वायरिंग, नेटवर्क केबल, कऊचख केबल, नेटवर्क स्विच, नेटवर्किंग साहित्य, विद्युत जोडणी आणि इतर आवश्यक उपकरणांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यमान सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार होणार आहे.संबंधित कंपनीने कामगिरी हमीपोटी आवश्यक बँक गॅरंटी सादर केली आहे. मान्य तांत्रिक निकषांनुसार काम करून घेण्याची जबाबदारी विद्युत विभागावर राहणार आहे. या कामासाठी महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद उपलब्ध असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
Related
Articles
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित
04 Nov 2026
भाजपच्या गुंडांकडून मध्यरात्री निवासस्थानावर हल्ला
08 Nov 2026
शनिवारवाडा 38 हजार 233 पणत्यांच्या तेजाने उजळला
09 Nov 2026
भारतासाठी थोडी आशा (अग्रलेख)
06 Nov 2026
युवा ऑलिम्पिकमध्ये धिनिधीचे दुसरे पदक
08 Nov 2026
धुळ्यात महामार्गावर दरोडा व्यापार्याला ३.६० कोटींना लुटले
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित