E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
चिंचवडमध्ये चार मजली इमारतीच्या पार्किंगला आग
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
21 वाहने भस्मसात
पिंपरी
: चिंचवड येथील चापेकर चौकाजवळील चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागून 17 दुचाकी, चार मोटारी आणि एक सायकल जळून खाक झाली. या आगीत एक जण किरकोळ भाजला असून, इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना गुरुवारी पहाटे दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कुणाल मार्केट या इमारतीत घडली.
चार मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे अचानक आग लागली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली. आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले. टेरेसवर अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या दुर्घटनेत एका व्यक्तीला किरकोळ भाजले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीत 17 दुचाकी, चार चारचाकी वाहने आणि एक सायकल भस्मसात झाली.
पहाटेच्या वेळी आग लागल्याने इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त, निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ढवण यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.
शॉर्टसर्किटमुळे आग?
पार्किंगमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
20 वर्षांच्या आर्याने वाचविले 70 ते 80 रहिवाशांचे प्राण
या दुर्घटनेवेळी इमारतीतील सुमारे 70 ते 80 रहिवासी गाढ झोपेत होते. अशा वेळी 20 वर्षांच्या आर्या कांबळे हिने प्रसंगावधान राखत सर्वप्रथम अग्निशमन दलाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. या प्रयत्नात तिच्या पायाला दुखापत झाली. आर्याने जोरात आवाज करून इमारतीतील रहिवाशांना घराबाहेर पडून टेरेसवर जाण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नव्हे, तर सर्वजण घराबाहेर पडले आहेत की नाही, याचीही तिने खात्री करून घेतली. मध्यरात्रीच्या त्या भयावह प्रसंगात आर्याने दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान अनेकांसाठी जीवनदायी ठरले. आर्याने वेळीच रहिवाशांना सावध केल्यामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. अवघ्या 20 वर्षांच्या आर्याने आगीच्या भीषण प्रसंगात केलेल्या मदतीमुळे रहिवासी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. तिच्या धाडसामुळे अनेकांना जणू नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्वतःच्या पायाला दुखापत होऊनही इतरांच्या सुरक्षेसाठी धावपळ करणार्या आर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Related
Articles
आणीबाणी लादणे ही एक चूक होती;इंदिरा गांधींनाही असेच वाटले असावे...
08 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
सिंहगड संस्थेच्या चार शाळांची मान्यता रद्द
09 Nov 2026
रविंद्रनाथ टागोर यांच्या शिल्पावर शाई फेकली
08 Nov 2026
आयुषच्या तिन्ही अभ्यासक्रमांना 84.30 टक्के प्रवेश
09 Nov 2026
वैष्णवी-ऋतुजाला उपविजेतेपद
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)