पिंपरी : ’पीएमआरडीए’ च्या वतीने नेरे, सांगवडे, साळुंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, धामणे, परंदवडी आदी गावांच्या बागायत क्षेत्रातून 65 मीटर रुंदीचा अंतर्गत रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. रिंग रोडला सात गावांचा कायमचा विरोध असून, रिंग रोडऐवजी मूळच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची शेतकर्यांची मागणी आहे. या वर्षी ’पीएमआरडीए’ने पुन्हा शेतकर्यांना रिंग रोडबाबत नोटिसा देऊन त्यांच्या बैठका घेतल्या. गोडुंब्रे येथे 23 ऑक्टोबरला भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार, उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील अधिकार्यांनी रिंग रोडच्या मोजणीला सुरुवात केली होती. मात्र. शेतकर्यांनी घटनास्थळी जाऊन मोजणी बंद पाडली. पूर्वीच्या नेरे कासारसाई यामार्गे असलेल्या 45 मीटर रुंदीच्या रस्त्याचे 20 मीटरने रुंदीकरण करून तो रस्ता पाचाणे येथे मुख्य रिंग रोडला जोडावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली. याबाबतचे निवेदन भूसंपादन अधिकारी व ’पीएमआरडीए’ अधिकार्यांना दिले असल्याची माहिती आंदोलनकर्ते शेतकरी सूर्यकांत सोरटे व पोपट राक्षे यांनी दिली.
Fans
Followers