कामगार नेते यशवंत भोसले यांची विनम्र अभियान पदयात्रा   

महापौर रवी लांडगे यांचे महापालिकेला कंत्राटी कर्मचार्‍यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश

पिंपरी : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष  यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेवर विनम्र अभियान पदयात्रा काढण्यात आली. यावेळी  महापौर रवी लांडगे यांची महापौर कार्यालयात भेट घेऊन कंत्राटी व मानधनावरील कर्मचार्‍यांच्या दिवाळी बोनस आणि वेतनासंदर्भात चर्चा केली.  कामगारांना 2025-26 या वर्षाचा बोनस आणि मासिक वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीला उपस्थित असलेले संबंधित मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना तातडीने कार्यवाही करून बोनस दिवाळीपूर्वी अदा करण्याचे परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या.
 
आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वाहन चालक वैद्यकीय मधील स्वच्छता सेवक, वार्ड बॉय, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उद्यान विभाग मधील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक शिपाई व इतर कर्मचारी, स्मशानामधील सर्व कर्मचारी, पाणीपुरवठा व जलवाहिनी विभाग मधील सर्व कर्मचारी सर्व प्रभागांमध्ये काम करणारे कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या सुमारे 4500 कर्मचार्‍यांना समान काम समान वेतन देण्यात यावे. यावेळी महापौर लांडगे म्हणाले, कामगार नेते यशवंत भोसले यांनी कामगारांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत.  बोनस देण्यासंदर्भातील परिपत्रक  संध्याकाळी किंवा उद्या काढण्यात येईल. आचारसंहितेबाबतची घोषणा अद्याप झालेली नसल्याने त्यानंतर सोमवारी सर्व कामगारांना बोनस देण्याबाबतची प्रक्रिया निश्चित करण्यात येईल.

Related Articles