E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
आज चौथा टी-20 सामना
ऑकलंड
: न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारी होणार्या चौथ्या टी-20 सामन्यात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना संधी देण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत या दोन्ही फिरकीपटूंना फारशा संधी मिळालेल्या नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची ताकद असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देण्याच्या रणनीतीवर संघ व्यवस्थापनाने दिलेला भर. आतापर्यंत ही रणनीती यशस्वी ठरली असून, भारताने मालिकेतील तिन्ही सामने जिंकले आहेत.
मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये आता फारसा दबाव नसल्याने भारतीय संघ प्रयोग करू शकतो. वरुण चक्रवर्तीची गेल्या सहा महिन्यांतील कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही. मात्र, कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये सातत्याने विकेट मिळवल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला दोन सामन्यांत संधी मिळाली होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांत त्याला राखीव खेळाडू म्हणूनच बसावे लागले.
तिसर्या टी-20 सामन्यात अक्षर पटेल आणि नमन धीर या दोन फिरकीपटूंचा समावेश होता. आतापर्यंत 115 सामन्यांत 7.70 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करणार्या अक्षरने या मालिकेत प्रति षटक 9.58 धावा दिल्या असून, त्याला केवळ दोन विकेट मिळाल्या आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने पहिल्या तीन सामन्यांत त्याने 72 चेंडूंमध्ये 139 धावा दिल्या असून, त्याची गोलंदाजी महागडी ठरली आहे.
सुर्यवंशीला पुन्हा संधी
गेल्या दोन सामन्यांत मयंक यादवच्या जागी प्रिन्स यादवला संधी देण्यात आली. आता मयंकला पुन्हा संघात स्थान मिळते की प्रिन्सवरच संघ व्यवस्थापन विश्वास दाखवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुखापतीमुळे ईशान किशनला गेल्या दोन सामन्यांत खेळता आले नाही. तो उद्याच्या सामन्यातही खेळू शकला नाही, तर वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी मिळू शकते.
फर्ग्युसन अखेरच्या दोन सामन्यांतून बाहेर
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन टी-20 सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मॅट फिशरचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. भारताने पहिले तिन्ही सामने जिंकून टी-20 मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एका निवेदनात म्हटले आहे, दुसर्या टी-20 सामन्यादरम्यान फर्ग्युसनच्या उजव्या पोटरीत वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागू शकतो.
भारतीय संघ
: श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, नमन धीर, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, मयंक यादव, कुमार कुशाग्र, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
Related
Articles
दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू
09 Nov 2026
पार्थ व जय पवारांमध्ये वाद निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न
04 Nov 2026
रब्बी पेरण्यांचा वेग मंदावला
04 Nov 2026
भविष्यातील युद्धे सीमेपुरती मर्यादित नसतील : राजनाथ
08 Nov 2026
नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली
04 Nov 2026
केवळ घुसखोरांच्या संरक्षणासाठी इंडिया आघाडीचा महामेळावा : सुवेंदू
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित