दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेची खराब सुरूवात   

केपटाऊन : निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 100 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या डावात 2 बाद 53 धावा केल्या असून, संघ अजूनही 47 धावांनी पिछाडीवर आहे. मार्करम (1) आणि बेडिंगहॅम यांना स्वस्तात माघारी धाडण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. मार्करमला स्टार्कने, तर बेडिंगहॅमला हेझलवूडने बाद केले. मार्केस अकरमन 33 धावांवर नाबाद आहे.
 
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 429 धावा केल्या. जोश इंग्लिसने 102 धावांची शतकी खेळी केली, तर अ‍ॅलेक्स कॅरीने 80 आणि मॅट रेनशॉने 74 धावांचे योगदान दिले. इंग्लिस आणि कॅरी यांनी पाचव्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने 4, तर मार्को यान्सेनने 3 विकेट घेतल्या.ऑस्ट्रेलियाची एकवेळची 370 धावांवर 4 बाद अशी भक्कम स्थिती होती; मात्र त्यानंतर झटपट विकेट्स पडल्याने डावाला खीळ बसली. अखेरीस ऑस्ट्रेलियाने 100 धावांची आघाडी मिळवली. आता निर्णायक कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला असून, ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मजबूत केली आहे.

Related Articles