E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
इस्रायली अनिश्चितता (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
बेंजामिन नेतान्याहू पुन्हा सत्तेत येतील की विरोधकांना संधी मिळेल?हा प्रश्न निर्माण झाला आहे. इस्रायलमध्ये मतदान पार पडले पण जनतेचा कौल गोंधळात टाकणारा आहे. नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाच्या नेतृत्वाखालील गटाला 53 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर त्यांचे विरोधक गादी आयझेनकॉट यांच्या याशर पक्षाच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांचा ’चेंज’ हा गट 48 जागांपर्यंत मजल मारेल असे दिसत आहे. इस्रायली समाजातील दुफळी या निवडणुकीने स्पष्ट केली आहे. केनेसेट या इस्रायली संसदेत 120 जागा आहेत व बहुमतासाठी 61 जागांची आवश्यकता आहे. दोन्ही गट बहुमतापासून दूर आहेत. अरब पक्षांना 19 जागा मिळण्याची शक्यता दाट आहे. आयझेनकॉट व अरब पक्ष एकत्र येतील का? हा कळीचा मुद्दा आहे. इराण विरुद्धच्या युद्धा नंतर झालेली ही निवडणूक इस्रायलसाठी महत्त्वाची आहे. एक प्रकारे नेतान्याहू यांच्या नेतृत्वावरील तो जनादेश मानला जात आहे. एकत्र येण्यात विरोधकांना यश आले नाही तर ते नेतान्याहू ’काळजीवाहू’ पंतप्रधान राहतील. बाहेरच्या पाठिंब्यावर अल्पमतातील सरकार इस्रायलमध्ये येणे शक्य असले तरी कोण कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न आहे. त्या वरील चर्चा लांबणार आणि प्रत्यक्ष सरकार स्थापन होण्यास बराच काळ लागणार अशी चिन्हे आहेत. संरक्षण सामग्री, तंत्रज्ञान आधारित उपकरणे, हिरे यांच्या निर्यातीतून इस्रायल पैसा मिळवतो. या देशाला अमेरिकेने अनेक दशके छुपा किंवा उघड पाठिंबा दिला आहे. तेथील अस्थिरता जागतिक राजकीय समीकरणे बदलू शकते.
’उजव्यां‘चे वर्चस्व
इस्रायलच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहाण्याचा विक्रम नेतान्याहू यांच्या नावे आहे. ते 19 वर्षे सत्तेत आहेत. ते स्वत:ला ’राष्ट्रवादी’ म्हणवून घेतात. ते कट्टर उजव्या विचारांचे आहेत. अरब व एकूण मुस्लिमांचा ते द्वेष करतात. त्यांच्या राजकीय धारणेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायल काहीसा एकाकी पडला आहे. तरी त्याचे अनेक देशांशी व्यावसायिक संबंध आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमास या संघटनेने इस्रायलवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देताना नेतान्याहू यांनी पॅलेस्टाईन, गाझा पट्टी येथे नरसंहार केला. जगातून त्याची निंदा झाली. पण त्यांना पाठिंबा देणारेही कमी नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेतान्याहू यांना महान योद्धा मानतात. अमेरिकेत झालेल्या इस्रायलविरोधी चळवळी त्यांनी दडपल्या हा ताजा इतिहास आहे. सरकारचे संरक्षण विषयक धोरण कुचकामी ठरल्याने हमासने हल्ला केला असा विरोधकांचा आरोप आहे. नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत व सुमारे 6 वर्षे खटले सुरु आहेत. विरोधक एकत्र न आल्यास जर त्यांना सत्ता टिकवता आली तर या खटल्यांचे भवितव्य काय असेल हाही प्रश्न आहे. त्यांना आव्हान देणारे आयझेनकॉट पूर्वी इस्रायलचे लष्करप्रमुख होते. गेल्या वर्षी स्थापन झालेल्या त्यांच्या पक्षाच्या ’याशर’या नावाचा अर्थ ’मध्यममार्गी’ असा होतो. त्यांचे धोरण काहीसे ’उदार’ असले तरी तेही ज्यूवादी आहेत.देशाच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सत्ता स्थापने साठी त्यांना तेरा जागांची गरज आहे. अरब पक्षांशी ते हातमिळवणी करण्याबाबत शंका आहे. नेतान्याहू यांना सत्तेतून दूर करण्यासाठी अरब पक्षांसह सरकार स्थापन करण्याचे आवाहन आयझेनकॉट यांना डेमोक्रॅटिक पक्षाने केले आहे. मात्र विरोधी गटातील अन्य पक्षांनी त्यास विरोध दर्शवला आहे. विरोधकांतील कलह नेतान्याहू यांच्या पथ्यावर पडू शकतो. इस्रायलमध्ये अरबांची लोकसंख्या सुमारे21 टक्के आहे. त्यात पॅलेस्टिनी देखील समाविष्ट आहेत. इस्रायलमध्ये घटना लिखित स्वरूपात नाही. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात समान राजकीय हक्कांची ग्वाही दिली असली तरी आपल्याला दुय्यम दर्ज्याची वागणूक मिळते अशी पॅलेस्टिनींची तक्रार आहे. इस्रायलची मानसिकता अरब विरोधी व पर्यायाने मुस्लिम विरोधी असल्याने अरब पक्ष संसदेत असले तरी ते सत्तेत कधीच नव्हते. त्यांच्या या मानसिकतेमुळेच जगभर ’उजव्या’ विचारांच्या संघटना व पक्षांत इस्रायलबद्दल प्रेम आहे. नेतान्याहू युद्धखोर आहेत, लष्करी कारवाईने आपल्या विरोधी देशांत सत्तापालट करण्याचा त्यांचा हेतू अनेकदा स्पष्ट झाला आहे. आता त्यांचे विरोधक पुरेसे समर्थ नसल्याने तेथे अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Related
Articles
अरुण लाल यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
08 Nov 2026
रुढी परंपरेनुसार लक्ष्मीपूजन उत्साहात
09 Nov 2026
पुणे महापालिकेत सहायक आयुक्तांच्या बदल्या
05 Nov 2026
भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला
06 Nov 2026
‘कोलगेट-पामोलिव इंडिया’च्या नफ्यात वाढ
06 Nov 2026
दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित