E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
चिप निर्मितीच्या क्षेत्रात भारताचा दबदबा वाढणार
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
वृत्तवेध
स्मार्टफोननंतर आता जगाचे नवे इंधन मानल्या जाणार्या चिप निर्मितीच्या क्षेत्रात भारत जागतिक वाटा वाढवण्याच्या तयारीत आहे. 2032 पर्यंत चिपची जागतिक बाजारपेठ 1.6 लाख कोटी डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. ही रक्कम जगातील अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षाही अधिक आहे. या जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा वाटा 25 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जगात उत्पादित होणार्या एकूण चिपपैकी सुमारे वीस टक्के चिपचा वापर भारतात होतो. सध्या भारतात दरवर्षी 45 ते 50 अब्ज डॉलर किमतीच्या चिप्सची गरज भासते. त्यापैकी सुमारे 30 अब्ज डॉलर किमतीच्या चिपची आयात केली जाते. सहा वर्षांपूर्वीपर्यंत भारत आपल्या गरजेच्या चिपसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून होता. 2021 मध्ये ‘सेमीकॉन इंडिया’ 1.0 कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात मायक्रॉन टेक्नॉलॉजी, केन्स सेमीकॉन आणि सीजी पॉवर यांसारख्या कंपन्यांनी भारतात चिप निर्मिती सुरू केली आहे. देशात चिप निर्मितीला सुरुवात झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या विशेष प्रकारच्या वायू आणि रसायनांच्या उद्योगालाही चालना मिळत आहे. 85 हजारांहून अधिक अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जात असून, पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये चिप निर्मिती क्षेत्रातून दहा लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या चिप निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या डिझाइनिंगच्या कामात भारतीय अभियंत्यांचा वाटा सुमारे 20 टक्के आहे. गुजरातमध्ये ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’ मेमरी चिपची निर्मिती करत आहे, तर ‘केन्स सेमीकॉन’ आणि ‘सीजी पॉवर’ या कंपन्या वाहन आणि औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणार्या चिपची निर्मिती करत आहेत. ‘सीजी पॉवर’ दररोज सुमारे 1.5 कोटी चिप तर केन्स सेमीकॉन दररोज 63 लाख चिपच्या उत्पादनाच्या पातळीवर काम करत आहे. गुजरातमध्ये उभारण्यात येणार्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रकल्पातून दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वापरल्या जाणार्या चिपची निर्मिती वर्ष 2028 पासून सुरू होणार आहे. आसाममध्ये उभारण्यात येणार्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसर्या उत्पादन प्रकल्पातून दुचाकी, कार आणि वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वापरल्या जाणार्या चिपची निर्मिती पुढील एक ते दोन वर्षांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. आसाममधील या प्रकल्पातून दररोज 4.8 कोटी चिपची निर्मिती केली जाणार आहे. ‘सेमीकॉन इंडिया’ 1.0 अंतर्गत चिप डिझाइनिंग, फॅब आणि पॅकेजिंग युनिट तसेच चिप निर्मितीशी संबंधित अन्य घटकांच्या उत्पादनासाठी सरकारने 76 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. या मदतीच्या माध्यमातून 1.64 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
Related
Articles
विना परवाना वाहनांचा आळेफाटा परिसरात सुळसुळाट
06 Nov 2026
वर्ल्ड टूर फायनल्समध्ये स्थान मिळवण्याचा लक्ष्य सेनचा प्रयत्न
10 Nov 2026
गोकुळातली दिवाळी
08 Nov 2026
अरुणाचलसह सहा राज्यांत एसएसआर
06 Nov 2026
फ्रान्समध्ये महागाईविरोधात कामगार संपावर
07 Nov 2026
लक्ष्मीपूजनानिमित्त व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये वहीपूजनाचा उत्साह
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)