E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
30 Oct 2026
ऊस दरावर तोडगा काढा
शेतकर्यांच्या ऊस पिकाला प्रति टन 5500/- दर मिळावा म्हणून शेतकरी संघटनेतर्फे आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे मात्र अजूनही ऊस दरांवर तोडगा निघालेला नाही. लवकरात लवकर यावरती तोडगा काढून साखर कारखाने सुरु करणे अपेक्षित आहे. सद्या दुष्काळाचे वारे घोंगावत असून पुढे जाईल तसे वास्तव अधिकच गडद होणारं आहे. त्यासाठी साखर कारखानदार, शेतकरी संघटना आणि केंद्र वा राज्य सरकारने एकत्रितपणे चर्चा करुन योग्य तोडगा काढावा अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. प्रत्येक वर्षी ऊस दरासाठी आंदोलने करावी लागत आहेत. त्यासाठी ऊस दारावर कायमस्वरूपी तोडगा काढणे तितकेच गरजेचे आहे. यंदा पाऊसाने ओढ दिल्याने ऊसाची वाढ खुंटली असून माळ रानावरील ऊस करपून जात आहे. त्यामुळे शेतकर्यांची कोंडी होत आहे.
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव
देशाविरोधी टीका नकोच
भारतविरोधी भूमिका घेणार्या पाकिस्तानचे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आभार मानल्याचे समोर आले आहे. बारामुल्ला येथील सभेत कार्यकर्त्यांसमोर त्यांनी केलेले. वक्तव्य निव्वळ राजकीय टीका नसून देशाच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर सोडलेले विषारी फुत्कार आहेत. काश्मीर हा स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग असून ज्या शेजारी पाकिस्तानने आजवर भारताला फक्त दहशतवाद, रक्तपात आणि अशांतता दिली, त्या पाकिस्तानचे कौतुक करणे आणि त्यांचे आभार मानणे अत्यंत संतापजनक आहे. फारुख अब्दुल्लांसारखे नेते भारताचे अंतर्गत प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन देशाची बदनामी करू पाहणार्या शक्तींचे समर्थन कसे काय करू शकतात? भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याला देशाच्या सुरक्षेशी आणि अखंडतेशी तडजोड करण्याचा अधिकार नाही.
प्रदीप मोरे, पार गाव, महाबळेश्वर
प्रदूषण हटवा
’मुंबईची हवा बिघडली’ हा परखड अग्रलेख मुंबईच्या निमित्ताने सर्वच फुगत चाललेल्या शहरांना इशारा देणारा आहे. मुंबईत पूर्वी काही भागच प्रदूषित होते पण वाढते बांधकाम, तुटणारी झाडे, वाढणारी वाहने हे सर्व प्रदूषणात भर टाकणारी कारणे आहेत. प्रदूषणामुळे होणार्या विकारात प्रचंड वाढ झालेली असून आता लहान मुलांनाही श्वासाचा त्रास सुरू झाला आहे. पुण्यातही साधारण हेच चित्र आहे आणि बारमाही व्हायरल ताप सोकावतो आहे, एकूणच प्रगतीच्या नावाखाली होणारे महामार्ग,त्यावर वाहनांचा सुळसुळाट, अती उंच इमारती हे सर्व बघायला सुंदर वाटले तरी प्रत्यक्षात त्याचा त्रास सर्व नागरिकांना होतो हे कटू सत्य आहे. फक्त पर्यावरण वाचवा म्हणून भागणार नाही, प्रशासनाने हवा स्वच्छ होण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत तसेच नागरिकांनी सुध्दा शक्य तिथे सार्वजनिक वाहने वापरणे सुरू केले पाहिजे.
माया भाटकर, पुणे
डेंग्यू जीवावर उठला
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंगू आजाराने अनेक लोक हैराण झाले असून या डेंगू मुळे काही लोकांचे बळी देखील गेले आहेत. डेंगू मलेरिया चिकनगुनिया हे विविध आजार सध्या मोठ्या प्रमाणे वाढत आहेत. डेंग्यू आजार हा डेंग्यू विषाणूमुळे होणारा एक धोकादायक ताप आहे, जो प्रामुख्याने एडीस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे पसरतो. कुलरचे पाणी, फुलदाण्या, टाकाऊ टायर्स, नारळाच्या करवंट्या, उघड्या टाक्या, घराच्या छतावर किंवा गॅलरीत साचलेले पाणी ही या डासांची प्रमुख पैदास केंद्रे आहेत. पुणे महानगरपालिके च्या वतीने डेंगू डासांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई चालू आहे परंतु नागरिकांची देखील तेवढी जबाबदारी आहे त्यांनी आपले घर स्वच्छ ठेवावे पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी नागरिकांनी स्वतःहून सांभाळले पाहिजे.
विजय आकुर्डेकर, पुणे
ऊसाला योग्य भाव द्या
अत्यंत भयानक दुष्काळ, बळीराजाची जीव घेणी परीक्षा. खरीप गेले आता पावसाअभावी रब्बी ही जाणार अशा भयानक स्थितीत बळीराजा कसा जगणार? बँक व खासगी कर्जाचे ओझे डोक्यावर तलवारी सारखे आहे. शेतकर्यांनी मोठ्या आशेने दोन-चार एकर ऊसाची लागवड केलेली होती. आता कसा -बसा ऊस कटाईला आलेला आहे. पाण्याच्या तानाने वजन कमी भरणार, वाहतूक खर्च, ऊस तोडीचा खर्च, खत व खंणणीखर्च, खुरपणी खर्च, शेती तयारी खर्च हे सर्व बघता शेतकरी दादांच्या ऊसाला प्रति टन पांच हजार किंवा त्यापेक्षा जास्त भाव साखर कारखान्यानी द्यावा अशी अपेक्षा आहे. कारण असा भाव दिला तरच शेतकरी या दुष्काळी परिस्थितीत सावरेल.
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
मतासाठी लक्ष्मी दर्शन !
देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाले या काळामध्ये देशामध्ये अनेक प्रकारच्या निवडणुका झाल्या यामध्ये लोकसभेची, विधानसभा, महानगरपालिका ग्रामपंचायत ,स्वराज्य संस्था, पदवीधर मतदार संघ शिक्षक मतदारसंघ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका झाल्या व या निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना लक्ष्मी दर्शन करण्यात आल्याच्या बातम्या आत्तापर्यंत अनेक वेळा वर्तमानपत्रातून वाचल्या आहेत .यावेळी देखील नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक झाली त्यात देखील लक्ष्मी दर्शन घडल्याची बातमी वाचली. सुशिक्षित पदवीधर व ज्ञानदान करणारे शिक्षक यासारख्या उच्च सुशिक्षित लोकांना सुद्धा लक्ष्मी दर्शन करावे लागते यासारखे दुर्दैव नाही.
विजय आकुर्डेकर, पुणे
Related
Articles
भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला
06 Nov 2026
लॉस एंजलीसच्या महापौरपदी नित्या रमण
07 Nov 2026
एसटी कर्मचाऱ्यांची दहा हजार रुपयांचा बोनस जाहीर
05 Nov 2026
इराणचे चीनमध्ये खनिज तेल साठवणूक, निर्यातीचे जाळे
11 Nov 2026
आर्यवीर सेहवागचे धडाकेबाज अर्धशतक
07 Nov 2026
इथेनॉल खरेदीतील दुहेरी प्राधान्यामुळे वाद
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)