E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
नेतन्याहू यांची आघाडी बहुमतापासून दूरच
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
इस्रायलमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस
जेरूसलेम : इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील लुकड पक्षाने विजयी आघाडी कायम ठेवली असली तरी ते बहुमताच्या आकड्यापासून दूरच राहतील, असे चित्र आहे. मात्र, सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष नेतन्याहू यांचा असेल, असेही अंदाजात नमूद केले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान आणि मतमोजणी सुरू आहे. ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी सुरू झाली होती. संसदेच्या १२० जागांसाठी मतदान झाले असून ६१ हा बहुमताचा आकडा गाठणारा पक्ष सत्तेवर बसणार आहे. मतदानोत्तर चाचणीच्या आधारे नेतन्याहू यांचा लुकड पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविला आहे. एकूण निकालाचा कल पाहता लुकड पक्षाला ५५ जागा तर माजी लष्कर प्रमुख गादी आयसनकोट यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख विरोधी पक्ष याला ४९ जागा मिळतील, असे सांगण्यात येते. मतमोजणी जशी होत राहील, तसा कलही बदलत राहणार आहे. माध्यमांच्या मते ७२.४ टक्के मतपेट्यातील मतदान मोजून झाले आहे. लुकड पक्ष ५४ तर विरोधी पक्ष ४८ जागा जिंकेल आणि अरब नेतृत्वाखालील पक्षाला १८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. एकूण १२० जागा आहेत. ज्या पक्षाला ६१ जागा मिळतील तो बहुमत प्राप्त करून सहज सत्ता प्राप्त करू शकतो.
दुहेरी पाकिटांद्वारे मतदान करण्याची पद्धत आहे त्यात सैनिक आणि त्यांच्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर मतदान करू न शकलेल्या इतर पात्र मतदारांच्या मतपत्रिकांचा त्यात समावेश आहे. मतदारांनी एकापेक्षा जास्त मतपत्रिका टाकलेली नाही ? याची खात्री केल्यानंतर स्वतंत्रपणे त्या मोजल्या जातात. मंगळवारी मतदान संपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मतदानोत्तर चाचणीपेक्षा ही आंशिक मतमोजणी वेगळी होती. त्यामध्ये सर्वसाधारणपणे विरोधी गटाला अल्प आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु कोणताही पक्ष बहुमताच्या जवळपास पोहोचलेला दिसत नव्हता, असे सांगण्यात आले.
अरब गटाची भूमिका निर्णायक ?
पंतप्रधान नेतन्याहू आणि माजी लष्कर प्रमुख आयसनकोट यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये अंदाजानुसार जागांमध्ये फारसे अंतर नाही. मात्र, अरब नेतृत्वाखालील गट कोणत्या पक्षाकडे वळतो ? यावर सत्तेचे समीकरण ठरणार आहे. त्यांना १६ ते १८ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुमत कोणत्याही पक्षाला मिळाले नाही तर अरब गट कुठे वळतो ? यावरच सत्ता कोणाची येईल, हे सांगता येणार आहे.
तीन प्रमुख वाहिन्यांचे अंदाज
तीन प्रमुख वाहिन्या अनुक्रमे १२, १२ आणि सार्वजनिक प्रसारण कान यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार विरोधी पक्ष ५१ ते ५५, नेतन्याहू यांचा पक्ष ५० ते ५२ जागा जिंकेल.आय २४ न्यूजने मतदानोत्तर चाचणीत नेतन्याहू यांना ५५ तर गादी आयसनकोट यांच्या पक्षाला ४९ जागांवर समाधान मानावे लागेल, असे म्हटले आहे. एकंदरीत नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली लुकड पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष असेल. मात्र त्यांना पाठिंबा देणारा व्यापक गट बहुमतापर्यंत पोहोचू
शकला नाही.
Related
Articles
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
08 Nov 2026
‘एसआयआर’नंतर पाच राज्यांत सव्वादोन कोटी मतदार घटले
03 Nov 2026
आयुक्तांच्या बंगल्याबाहेर मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा
05 Nov 2026
जनतेचा कौल मान्य नसेल तर निवडणुका तरी कशाला घेता?
04 Nov 2026
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार
03 Nov 2026
सोलापुरात आज 'आरोग्य संवाद यात्रा'
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित