इस्रायली दूतावासाच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला   

सर्बियातील बेलग्रेडमध्ये हल्लेखोर ठार

बेलग्रेड : सर्बियाची राजधानी बेलग्रेडमधील इस्रायलच्या दूतावसातील सुरक्षा रक्षकावर हल्ला करणारा मारला गेल्याची माहिती सबियाच्या पोलिसांनी दिली. दूतावसाबाहेर मध्यरात्री हल्ला झाला होता. त्यानंतर काही वेळात हल्लेखोराला ठार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. 
 
गृहमंत्री आयव्हिका डाकीक यांनी सांगितले की, दहशतादी हल्ला समजून पोलिस कारवाई करत आहेत. कडेकोट पोलिस सुरक्षेने वेढलेल्या दूतावासाबाहेर रक्षकावर हल्ला करण्यात आल्याची गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. अल्लाहु अकबर, असे हल्लेखोराचे नाव असून तो अल्पवयीन आहे. त्याच्याकडून दोन चाकू जप्त केले. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षण करताना त्याला ठार केले. तो इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेशी संबंधित असावा, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर इस्लामिक स्टेटला पाठिंबा देण्यासाठी संघटनेचा काळा झेंडा प्रदर्शित केला होता.

सर्बियामध्ये तरुणांचे सरकार 

 
सर्बियातील संसदेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. दीर्घकाळ सत्तेत राहिलेले माजी अध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांचा, त्यांच्या विरोधात सुमारे दोन वर्षे चाललेल्या आंदोलनानंतर, तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळीकडून पराभव झाला. मात्र, नवीन सरकार अद्याप स्थापन झालेले नसल्यामुळे, पोलिस दलावर अजूनही वुसिक आणि त्यांच्या सहकार्‍यांचेच नियंत्रण आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोमावारी दूतावसातील रक्षकांवर हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. 

Related Articles