E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
‘एसआयआर’अंतर्गत वगळलेल्या ४७ लाख मतदारांशी संपर्क साधा
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश
नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ मतदार अनुपस्थित राहिला म्हणून तो अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक आयोगाला एसआयआरनंतर वगळलेल्या ४७ लाख मतदारांशी संपर्क साधण्यासाठी उपाययोजना करा, असे निर्देश दिले.
राजधानी दिल्लीत मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहिमेनंतर १.४५ कोटी मतदारांपैकी ४७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा उभी करा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ज्या मतदारांची नावे आधी मतदार यादीत होती. मात्र, प्रारूप यादीत वगळली गेली, त्यांना पुन्हा नाव नोंदवण्यासाठी फॉर्म ६ भरण्यास सांगण्याचे कारण काय? असा सवालही न्यायालयाने यावेळी आयोगाला केला.सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीसाठी आहे.
एसआयआरअंतर्गत जी ४३ लाख नावे वगळली गेली आहेत त्यांची यादी जाहीर करा. त्यांच्याशी संपर्क साधा, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच, या प्रकरणावर दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने सांगितले. या संदर्भात अंजली भारद्वाज आणि अमृता जोहरी यांनी अर्ज दाखल केला आहे.
Related
Articles
रविंद्रनाथ टागोर यांच्या शिल्पावर शाई फेक
07 Nov 2026
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण
05 Nov 2026
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या; पाण्याचा काटकसरीने वापर करा
06 Nov 2026
झेंडूच्या मखमली सौंदर्याला कवडीमोल भाव
09 Nov 2026
राष्ट्रीय मुद्द्यांवर विरोधकांनी अडवानींचा आदर्श घ्यावा : नितीन नवीन
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)