मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या; काँग्रेसने किती जागा जिंकल्या?   

मोदी यांनी फटकारले

नवी दिल्ली : चार राज्यांत विधान परिषेदेच्या २८ जागांसाठी मतपत्रिकेवर निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसने किती जागा जिंकल्या? अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला फटकारले आहे. 
 
काँग्रेससह विरोधी पक्षांनी सातत्याने पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रावर (ईव्हीएम) फोडण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर, ईव्हीएमविरोधात विरोधकांनी मोठी मोहीम उघडली होती. ते सातत्याने मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी करत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. यावरुन, पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
 
मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांत विधान परिषदेच्या २८ जागांसाठी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसने किती जागा जिंकल्या?
 

Related Articles