E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
राज्यसभा निवडणूक
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांना भाजपने मध्य प्रदेशातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पुरी यांच्या नावाला मंजुरी दिली असल्याचे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. पुरी सध्या केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
पुरी सध्या उत्तर प्रदेशातील राज्यसभा सदस्य असून २५ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या आठ जागांसाठी भाजपने नुकतीच उमेदवारी जाहीर केली होती. यात पुरी यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
दरम्यानच्या काळात तामिळनाडूतील भाजप नेते एल. मुरुगन यांनी मध्य प्रदेशातील राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. मुरुगन हे संसदीय कामकाज तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०३० रोजी संपणार होता.
Related
Articles
सिंहगड संस्थेच्या चार शाळांची मान्यता रद्द
09 Nov 2026
13 टीएमसीचा कालावधी नोव्हेंबरपासून हवा
06 Nov 2026
घरकाम करणार्या महिलांनी घेतली पाणी वाचवण्याची शपथ
05 Nov 2026
जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी; परिसर रिकामा
03 Nov 2026
जैस्वाल, तिलकची दमदार खेळी; भारत ‘अ‘ सुस्थितीत
09 Nov 2026
‘फेडरल रिझर्व’च्या निर्णयावर सोन्याचे भाव अवलंबून
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित