E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
आंध्रनंतर ‘अर्णब’चा ओडिशाला तडाखा
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
आंध्रात पाच जणांपैकी तिघांचा विजेचा धक्का बसून मृत्यू
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळाने बुधवारी मध्यरात्री आंध्र किनारपट्टीला तडाखा दिला. इलेक्ट्रिक खांब आणि झाडे उन्मळून पडली. तसेच रस्त्यांचे, ३० मालमत्तांचे नुकसान झाले असून पाच जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर वादळाचा जोर कमी झाला असला तरी वारे आणि मुसळधार पाऊस परिसरात कोसळला. यानंतर चक्रीवादळाने उत्तर अणि वायव्य दिशेने मार्गक्रमण करत ओडिशा राज्याला तडाखा दिला.
आंध्रात विजेचा धक्का बसून दोघांचा बळी गेला आहे. मध्यरात्री दोन ते सकाळी आठ वाजेपर्यंत चक्रीवादळाने यमन किनारपट्टी ओलांडली होती. यानंतर त्याचा जोर कमी झाला होता. मात्र, परिसरात २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळाने नुकसान केले. इलेक्ट्रिक खांब आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता, अशी माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली. बळी गेलेल्यांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा विशाखापट्टणम जिल्ह्यात शेतातील कालव्याजवळ मृत्यू झाला आहे. मालमत्तांचे नुकसान टाळण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी ३० हजार जणांशी संपर्क साधला होता.
ओडिशात ३० हजार जण सुरक्षित स्थळी
ओडिशाला वादळाचा तडाखा बसल्यानंतर दक्षिणेकडील जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळल्या. दुपारनंतर वादळ तेथे पोहोचण्याची शक्यता गृहीत धरून सुमारे ३० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्याची मोहीम राबविली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी दिली. मलकनगिरी जिल्ह्यात वादळाचा सर्वाधिक फटका बसला. सखल भाग आणि दरडी कोसळण्याचा प्रदेश असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे भाग पडले. त्याशिवाय गंजम, गजपती, रायगड, कोर्पट आणि नाबरंगपूर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. ३० जिल्ह्यातील १६ शाळा, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली. २०३७ आश्रयस्थाने तयार केली. अन्न, पाणी व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था केली. कालाहंडी, कंधमाल आणि नौपाडा जिल्ह्यात दक्षतेचा इशारा दिला. पूर्व किनारपट्टीवरील सुमारे ५० रेल्वेगाड्या रद्द केल्या. दहा ठिकाणी झाडे पडण्यच्या घटना घडल्या. रेल्वेेसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जातील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
Related
Articles
दहा महिन्यात 14 सराईत गुन्हेगारांविरूद्ध मकोका
08 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
वैष्णवी-ऋतुजाला उपविजेतेपद
09 Nov 2026
लॉस एंजलीसच्या महापौरपदी नित्या रमण
07 Nov 2026
झेंडूच्या मखमली सौंदर्याला कवडीमोल भाव
09 Nov 2026
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 9 जखमी
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)