E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
उत्तर प्रदेशात भाजपला सहा,समाजवादी पक्षाला तीन जागा
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
लखनौ : उत्तर प्रदेशासह चार राज्यांत २८ विधान परिषद मतदारसंघांसाठी पार पडलेल्या द्वैवार्षिक निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. कर्नाटकात काँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही. उत्तर प्रदेशात भाजपने सहा आणि समाजवादी पक्षाने तीन जागा जिंकल्या. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ’महायुती’ तीन जागांवर आघाडीवर होती, तर महाविकास आघाडी दोन जागांवर आघाडीवर होती. बिहारमध्ये जन सुराज पक्षाने खाते उघडले असून, भाजप, धर्मनिरपेक्ष जनता दल, राष्ट्रीय जनता दल एका अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
उत्तर प्रदेशातील सहा शिक्षक व पाच पदवीधर मतदारसंघ, बिहारमधील शिक्षक व पदवीधरच्या प्रत्येकी चार, कर्नाटकातील शिक्षक व पदवीधरच्या प्रत्येकी दोन, महाराष्ट्रातील तीन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकांमध्ये केवळ पदवीधर आणि शिक्षक मतदारच आपला हक्क बजावू शकतात. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांद्वारे घेण्यात आली.
उत्तर प्रदेशात ११ पैकी ९ जागांचे निकाल जाहीर झाले होते. तर, दोन जागांची मतमोजणी दुसर्या दिवशीदेखील सुरुच होती.आग्रा पदवीधर मतदारसंघातून भाजप उमेदवार मानवेंद्र प्रताप सिंग विजयी झाले. बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघातही भाजप विजयी पताका कायम ठेवली. हरी सिंग ढिल्लन यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार दानिश अख्तर यांचा १७,६७६ मतांनी पराभव केला.भाजपने लखनौ शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला. भाजप उमेदवार उमेश द्विवेदी यांनी समाजवादी पक्षाचे सुशील कुमार यांचा ६,९९२ मतांनी पराभव केला.
मेरठमध्ये भाजपने शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला. वाराणसी शिक्षक मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे लाल बिहारी यादव विजयी झाले.आग्रा-अलीगढ शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आकाश अग्रवाल यांनी भाजपचे उमेदवार हरी किशोर तिवारी यांचा पराभव केला. गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपचे ध्रुव कुमार त्रिपाठी हे अपक्ष उमेदवार राजीव यादव यांच्यापेक्षा ४६६ मतांनी आघाडीवर होते. वाराणसी आणि लखनौ पदवीधर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते.
Related
Articles
युवा ऑलिम्पिकमध्ये धिनिधीचे दुसरे पदक
08 Nov 2026
अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय
09 Nov 2026
बनावट चित्रफित प्रकरणी प्रशांत भूषण यांच्यावर गुन्हा
05 Nov 2026
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
05 Nov 2026
प्रेमा रावतचा वेगवान अर्धशतकाचा विक्रम
04 Nov 2026
मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित