E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
‘जन सुराज’ने खाते उघडले
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
पाटणा : बिहार विधान परिषद निवडणुकीत जन सुराज पक्षाने आपले खाते उघडले आहे. दरभंगा शिक्षक मतदारसंघातून जन सुराजचे उमेदवार सुरेश प्रसाद राय यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य मदन मोहन झा यांचा ३२४ मतांनी पराभव केला. तिरहुत शिक्षक मतदारसंघातून भाजप उमेदवार नरेंद्र प्रसाद सिंग यांनी निकटचे प्रतिस्पर्धी, अपक्ष उमेदवार भूषण कुमार झा यांचा पराभव केला. कोसी पदवीधर मतदारसंघातून भाजप उमेदवार एन. के. यादव विजयी झाले.
पाटणा पदवीधर मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे उमेदवार नीरज कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. मात्र, या जागेचा अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. पाटणा शिक्षक मतदारसंघात भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य नवल किशोर यादव यांचा राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार संजीव कुमार यांनी पराभव केला. सारण शिक्षक मतदारसंघात विद्यमान विधान परिषद सदस्य अफाक अहमद यांचा अपक्ष उमेदवार राहुल राज यांनी पराभव केला. अन्य दोन जागांवर मतमोजणी सुरू होती. राज्यात पदवीधरच्या चार जागांसाठी ९० आणि चार शिक्षक मतदारसंघात ६० उमेदवार रिंगणात होते. शिक्षक मतदारसंघांत ८२.८५ टक्के, तर पदवीधर मतदारसंघांत ५३.४२ टक्के मतदान झाले होते.पाटणा, दरभंगा, तिरहुत आणि कोसी पदवीधर मतदारसंघांत ४.९२ लाख पात्र मतदार होते. तर पाटणा, दरभंगा, तिरहुत आणि सारण शिक्षक मतदारसंघांत ४०,२५३ मतदार होते.
Related
Articles
बाळराजे पाटलांकडून जयकुमार गोरेंचा सन्मान
11 Nov 2026
शमीने वेगवान गोलंदाजीच्या एका युगाला आकार दिला : बीसीसीआय
09 Nov 2026
कमांडर
09 Nov 2026
अरुण लाल यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
08 Nov 2026
अजित पवारांनी विलीनीकरणाची तारीख सांगितली होती
09 Nov 2026
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)