भारत आणि अमेरिकेमध्ये होणार दहा वर्षांचा संरक्षण करार   

राजनाथ, हेगसेथ यांच्यात चर्चा

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे युद्ध मंत्री पीट हेगसेथ यांनी बुधवारी भारत-अमेरिका यांच्यातील दहा वर्षांच्या संरक्षण आराखडा कराराच्या प्रगतीचा आढावा घेतला.
 
महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, माहितीची देवाणघेवाण आणि लष्करी उपकरणांचे संयुक्त उत्पादन यांसारख्या क्षेत्रांत धोरणात्मक समन्वय साधणे हा कराराचा प्रमुख हेतु आहे.  फिलिपिन्समधील सेबू येथे सिंह आणि हेगसेथ यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये हिद आणि प्रशात क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि वेगाने बदलणार्‍या प्रादेशिक सुरक्षा समीकरणांचा समावेश होता. 
 
भारत आणि अमेरिकेने ऑक्टोबर २०२५ मध्ये संरक्षण आराखड्यावर स्वाक्षरी केली. त्या अतंर्गत धोरणात्मक भागीदारीला बळकट करण्यासाठी आणि महत्त्वाच्या संरक्षण क्षेत्रांत सहकार्य विस्तारण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा निश्चित केला होता. सिंह यांनी चर्चा चांगली झाल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंनी या आराखड्यांतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि धोरणात्मक एकमत अधिक सखोल करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, आमची भक्कम भागीदारी ही मुक्त, खुल्या आणि सुरक्षित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी एक आधारस्तंभ राहिली आहे.
 

Related Articles