E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
बारामती विमान अपघाताच्या चौकशीला गती द्या
Wrutuja pandharpure
29 Oct 2026
जय पवार यांची सीआयडी अधिकार्यांकडे मागणी
पुणे
: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघाताची चौकशी त्वरित, पारदर्शक आणि कोणताही विलंब न करता पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी केली. बुधवारी त्यांनी पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन तपासाच्या प्रगतीचा आणि आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा
आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काकडे उपस्थित होते.
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ विमान उतरत असताना झालेल्या या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी सीआयडी अधिकार्यांशी चर्चा करून तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई, प्रलंबित मुद्दे आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी याबाबत माहिती घेतली.
तपासातील दिरंगाई खपवून घेणार नाही
विमान अपघाताच्या चौकशीत कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली. अपघातामागील तांत्रिक त्रुटींसह अन्य संभाव्य कारणांची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. तपासात दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या अपघाताची चौकशी सीआयडी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) केली जात असल्याचे सांगण्यात आले. तपासातील सर्व बाबींची पडताळणी करून अपघातामागील सत्य जनतेसमोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार जय पवार यांनी व्यक्त केला.
लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न
अजित पवारांच्या अपघातामागील खरे सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा विषय नाही, तर त्यांच्यावर प्रेम करणार्या आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. या अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे जय पवार यांनी सांगितले. अपघाताच्या चौकशीतील प्रगती, प्रलंबित मुद्दे आणि अंतिम अहवालाबाबत स्पष्टता मिळावी, यासाठी जय पवार यांनी अधिकार्यांची भेट घेतली. आता या प्रकरणातील तपासाचा पुढील टप्पा आणि अधिकृत निष्कर्ष कधी समोर येतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
शनिवारवाडा 38 हजार 233 पणत्यांच्या तेजाने उजळला
09 Nov 2026
अनमोल आणि तन्वीची दुसर्या फेरीत धडक
05 Nov 2026
लखनौ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात
09 Nov 2026
रविंद्रनाथ टागोर यांच्या शिल्पावर शाई फेक
07 Nov 2026
कर्जत तालुक्यात कापसाच्या शेतात गांजाची लागवड
06 Nov 2026
मनू भाकर, सुरुची अंतिम फेरीत
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)