E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
सुकामेवा दहा टक्क्यांनी महाग
Wrutuja pandharpure
29 Oct 2026
पुणे
: दिवाळीत सुकामेवा भेट देण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीत सुकामेव्याला संस्था, कंपन्या, राजकीय व्यक्ती, सामाजिक संस्था आदींकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. मात्र यंदा एकीकडे दुष्काळ आहे, तर दुसरीकडे दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सुकामेव्याला मागणी कमीच असल्याची माहिती व्यापारी नवीन गोयल यांनी दिली.
दरवर्षी दिवाळीत भेट देण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता, खजूर, अंजीर, जर्दाळू आणि मनुक्यांचा वापर केला जातो. त्यामुळे मागणीही अधिक असते. दिवाळीच्या पंधरा दिवस आधीच ग्राहक खरेदीला सुरुवात करतात. मात्र यंदा अधिकचा खर्च टाळण्यावर सर्वजण भर देत आहेत. त्यामुळे सुक्यामेव्याला अद्यापही मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली नाही. येत्या दोन दिवसांत काही प्रमाणात खरेदीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
मार्केटयार्डातील भुसार बाजारात अमेरिका (कॅलिफोर्निया) येथून बदाम, अक्रोड तर सौदी अरेबिया, इराक, इराण आणि अफगाणिस्तानातून पिस्ता, खजूर व खारीक तसेच तुर्कस्तानहून अंजीरची आयात होत आहे. व्हिएतनामहून काजू आवक होत आहे. भेट देण्यासाठी सुकामेव्याची खरेदी करून त्यांचे पॅकिंग करण्यासाठी कमी दिवस उरले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत ग्राहकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. मात्र मागणी मागील वर्षीच्या तुलनेत कमीच असणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
दुष्काळामुळे मागणी कमी
यंदा राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सुकामेव्याला मागणी कमी आहे. दरवर्षी संस्था, कंपन्याकडून कामगारांना सुकामेवा भेट दिला जातो. त्याचेही प्रमाण यावेळी कमीच असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दरामध्ये 10 टक्के वाढ झाली आहे. आयात शुल्कात वाढ झाल्यामुळेही दर वाढले आहेत. पुढील दोन दिवसांत मागणी वाढण्याची शक्यता आहे.
- नवीन गोयल, सुकामेवाचे व्यापारी
घाऊक बाजारातील प्रतिकिलोचे दर
सुकामेवा
आधीचे दर
आताचे दर
काजू
800 ते 1200
900 ते 1300
बदाम
700 ते 900
1000 ते 1100
पिस्ता
1400 ते 1800
1800 ते 2200
अक्रोड 1200 ते 1,300
1200 ते 1400
मनुका 400 ते 600
400 ते 600
जर्दाळू 400 ते 600
400 ते 600 (स्थिर )
Related
Articles
चिवड्यासाठी कढीपत्त्याला मागणी; दरातही वाढ
05 Nov 2026
अल्काराझची रुडवर मात
09 Nov 2026
व्हाट्सऍप कट्टा
08 Nov 2026
१२ नोव्हेंबरपासून पंढरपुरात भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय सुरू
11 Nov 2026
आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू
05 Nov 2026
पुण्यातील सहा ‘आपला दवाखाने’ रद्द
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)