E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा
Wrutuja pandharpure
29 Oct 2026
शेतकर्यांना आवाहन; नवीन पशुधनाचे टॅगिंगही अनिवार्य
पुणे
: राज्यातील 305 तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाला चारा, पाणी आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन सुरू केले आहे. दुष्काळाच्या काळात सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र पशुपालकांपर्यंत पारदर्शकपणे आणि थेट पोहोचविण्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन’ (एनडीएलएम) प्रणालीवर नोंदणी अद्ययावत करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा, चारा बियाणे, ठोंबे, वैद्यकीय उपचार आणि इतर आवश्यक सुविधांचा पुरवठा प्रभावीपणे करता यावा, यासाठी पशुधनाची अचूक डिजिटल नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची नोंदणी तपासून ती अद्ययावत करावी, तसेच नव्याने दाखल झालेल्या पशुधनाचे टॅगिंग करून त्याची नोंद प्रणालीवर करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
नवीन पशुधनाच्या कानात 12 अंकी क्रमांकाचा बिल्ला (टॅग) बसवून त्याची माहिती ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी पशुपालकांनी आपल्या परिसरातील जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. नोंदणी आणि टॅगिंगमुळे पशुधनाची माहिती अचूकपणे उपलब्ध होण्यास मदत होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे सुलभ होणार आहे. दुष्काळाच्या काळात पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पशुपालकांनी पशुधनाची नोंदणी व टॅगिंग वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन व संवर्धन करणे ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. डिजिटल नोंदणीमुळे चारा बियाणे, ठोंबे आणि इतर मदत पात्र पशुपालकांपर्यंत अचूकपणे पोहोचविणे शक्य होईल. त्यामुळे पशुपालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. किरण पाटील, आयुक्त पशुसंवर्धन
Related
Articles
52 वृक्ष तोडण्यास नियमबाह्य परवानगी दिल्याबद्दल मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटीस
09 Nov 2026
पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावरून नवा वाद?
08 Nov 2026
हरवलेली माणसं
10 Nov 2026
शेतकरी, महिलांकडून सक्तीने कर्जवसुली नको
05 Nov 2026
त्रिपुरात पथकावरील हल्ल्यानंतर बीएसएफची आक्रमक कारवाई
09 Nov 2026
जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन संशयिताना अटक
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)