नवी खडकीत हजारो लीटर पाणी रस्त्यावर   

तीन महिन्यांपासून वाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

येरवडा :  दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी नाल्यात वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी खडकी येथील सुभाष नगर भागात, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या तीन महिन्यांपासून फुटली असून, यामुळे  दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर समस्येबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तीन महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या पाणी गळतीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महानगरपालिकेने या समस्येची त्वरित दखल घ्यावी.

Related Articles