E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
माणमध्ये ३८ गावांसह २२४ वाड्यांना टँकरने पाणी
Samruddhi Dhayagude
29 Oct 2026
नागरिकांसह जनावरांचेही हाल; चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर
सातारा, (प्रतिनिधी) : पावसाने ओढ दिल्याने व परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे माण तालुक्यात भीषण आणि दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालल्यामुळे माणसांसह मुक्या जनावरांचे हाल सुरू आहेत. ऑक्टोबर महिना संपतानाच माण तालुक्यातील ३८ गावे आणि २२४ वाड्या-वस्त्यांवरील ५१ हजार ७९६ नागरिकांना, तसेच ४१ हजार १४१ पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत आहे. या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या प्रशासनाकडून एक शासकीय आणि ३२ खासगी अशा एकूण ३३ टँकरद्वारे दररोज ७० खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यामध्ये दहिवडी मंडलातील बिजवडी, पांगरी, पाचवड, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी व तोंडले, शिंगणापूर मंडलातील अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी व वावरहिरे. म्हसवड मंडलातील संभूखेड, शिरताव, कारखेल व धुळदेव. गोंदवले बुद्रुक मंडलातील पिंगळी बुद्रुक. मार्डी मंडलातील मार्डी, इंजबाव, भालवडी व खुटबाव. वरकुटे मलवडी मंडलातील विरळी, कुरणेवाडी, शेनवडी, बनगरवाडी व पानवण. मलवडी मंडलातील वारुगड. आंधळी मंडलातील परकंदी, टाकेवाडी, सुरुपखानवाडी, शिंदी बुद्रुक व कोळेवाडी. कुकुडवाड मंडलातील कुकुडवाड व दोरगेवाडी या गावांचा समावेश आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा असतानाच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दहा विहिरी आणि सहा बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत. येत्या काळात पाऊस झाला नाही, तर पाण्याचे संकट अधिक गडद होणार आहे. शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला, तरी या दुष्काळी भागातील जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शाश्वत सिंचन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
माण तालुक्यातील जवळपास दहा महत्त्वाचे पाणी साठवण तलाव कोरडे पडले आहेत. अनेक तलावांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. आंधळी धरणाचा उजवा कालवा एकेकाळी सुरू होता. मात्र, तो पूर्णपणे बंद असल्यामुळे लाभधारक जमिनी पाण्याविना पडीक राहिल्या आहेत.
Related
Articles
कमांडर
09 Nov 2026
म्हसवडच्या सिद्धनाथांचा मंगळवारपासून विवाह सोहळा
08 Nov 2026
इथेनॉल खरेदीतील दुहेरी प्राधान्यामुळे वाद
07 Nov 2026
सौदी अरेबियाने हवेतच रोखली क्षेपणास्त्रे
09 Nov 2026
सत्तेत बसून मोर्चे काढणार्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा हास्यास्पद
06 Nov 2026
शेअर बाजारात किरकोळ वाढ
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)