राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी सिद्दीकी   

मुंबई, (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षांपासून रिकाम्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांनी बुधवारी सिद्दीकी यांना नियुक्तीचे पत्र दिले.
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी चूल मांडल्यानंतर पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, समीर भुजबळ यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून पक्षाचे मुंबई अध्यक्षपद रिकामे होते. आता सिद्दीकी यांच्या नेमणुकीने अजित पवार गटाला दोन वर्षांनंतर मुंबईसाठी नेतृत्व लाभले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

Related Articles