जालंधर: पाच वेळच्या विजेत्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मनदीप सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने बांगलादेशचा 13-0 असा एकतर्फी पराभव केला. मनदीपने तिसर्या, दहाव्या आणि 54व्या मिनिटाला गोल केले. कर्णधार हरमनप्रीत सिंह, दिलप्रीत सिंह आणि उपकर्णधार हार्दिक सिंह यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. शिलानंद लाकडा, अभिषेक, नीलकांत शर्मा आणि जुगराज सिंह यांनीही गोल करत भारताच्या मोठ्या विजयात योगदान दिले.सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने वर्चस्व राखले. हरमनप्रीतने दुसर्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने 6-0 अशी आघाडी घेतली. तिसर्या सत्रात दिलप्रीतने एका मिनिटात दोन गोल केले, तर अखेरच्या सत्रात भारताने आणखी सात गोल झळकावले. भारताचा पुढील सामना गुरुवारी चीनविरुद्ध होणार असून, बांगलादेशचा सामना मलेशियाशी होईल.
Fans
Followers