E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
दोन निवडणुकांचा अर्थ (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
29 Oct 2026
ब्राझिलच्या इतिहासात लुइझ इनासिओ लुला ड सिल्वा-अथवा ’लुला’-यांनी अध्यक्षपदाची निवडणूक सलग चौथ्यांदा जिंकून अशक्यप्राय कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीत लुला दुसर्या स्थानावर होते. त्यांचे प्रतिस्पर्धी फ्लाविओ बोल्सोनारो अध्यक्ष बनण्याची शक्यता वाटत होती. लुला यांनी आपल्या प्रचारातील उणिवा शोधल्या. सामाजिक कल्याणकारी योजना व विकास यांची सांगड घालण्याचे आश्वासन दिले. दुसर्या फेरीत लुला यांना 51.7 तर फ्लाविओ यांना 48.2 टक्के मते मिळाली. ’वर्कर्स पार्टी’ आणि लुला पुन्हा सत्तेत आले. पुन्हा निवडणूक जिंकू पाहाणारे अध्यक्ष एवढीच लुला यांची ओळख नाही. जागतिक डाव्यांचा ते महत्त्वाचा चेहरा आहेत. दक्षिण अमेरिकेत आलेली ’उजव्या विचारां’ची लाट लुला यांनी थोपवली आहे. गरीब, वंचित व श्रमिक वर्गासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांची धोरणे सर्व समावेशक आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी फ्लाविओ हे कट्टर उजव्या विचारांचे आहेत. त्यांचे वडील जैर बोल्सोनारो यांनी लुला यांच्या विरोधात 2022 मध्ये उठाव केला होता. ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांची सुटका करण्याचे व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याचे फ्लाविओ यांनी जाहीर केले होते. साहजिकच लोकशाहीवादी नागरिकांनी लुला यांना पसंती दिली. जनतेत लोकशाहीची आस असणे देशाच्या खर्या विकासाचा पाया असतो हे ब्राझिल व सर्बियातील मतदारांनी दाखवून दिले. स्वत:ला सांस्कृतिक म्हणवून घेणारी ‘संघ‘टना भारतातील ‘संभाव्य‘ सत्ताबदलाबद्दल चिंतेत का आहे?
विद्यार्थ्यांचा विजय
जरी ब्राझिल छोटा देश असला तरी दक्षिण अमेरिकेतील ती मोठी अर्थव्यवस्था आहे. तेथील दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) भारताच्या तिप्पट आहे. सरासरी वेतन व जीवनमान या बाबतीतही हा देश बराच पुढे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ’प्रत्युत्तर शुल्का’स लुला यांनी ठाम विरोध केला होता. अर्थातच ट्रम्प यांना लुला नकोसे वाटतात. फ्लाविओ यांनी पराभवानंतर अमेरिकेस पलायन केले हे लक्षणीय आहे. ज्या ’ग्लोबल साउथ’ची चर्चा सध्या होत आहे त्यात तसेच ’ब्रिक्स’गटात ब्राझिल व लुला यांचे स्थान महत्त्वाचे आहे. लुला जिंकले असले तरी काँग्रेसमध्ये उजव्या विचारांच्या लिबरल पार्टीचे बहुमत आहे. आपल्या सामाजिक व आर्थिक सुधारणा मंजूर करून घेणे व त्या राबवणे हे लुला यांच्या समोरचे मोठे आव्हान आहे. ब्राझिलच्या मतदारांनी सातत्यास कौल दिला आहे तर सर्बिया या छोट्या युरोपीय देशाने बदल स्वीकारला आहे. विद्यार्थी व युवकांनी सत्तांतर घडवले हे महत्त्वाचे आहे. सर्बियातील अलेक्सांदार व्हुचिच यांची 12 वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे. कधी अध्यक्ष तर कधी पंतप्रधान हे पद घेत उजव्या विचारांच्या व्हुचिच यांनी सत्ता मुठीत ठेवली होती. ते स्वत:ला ’राष्ट्रवादी’ म्हणवून घेत होते. आपल्या कारकीर्दीत भ्रष्टाचार वाढल्याचे ते मान्य करत नव्हते. एका रेल्वे स्टेशनचे छत कोसळून 16 जण मरण पावले. या दुर्घटनेमागे भ्रष्टाचार असल्याचे आरोप झाले. तेव्हापासून देशात युवक, विद्यार्थी यांनी आंदोलन सुरू केले. सरकार व प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला होता. व्हुचिच यांच्या मर्जीतील उद्योगपती, पक्षाचे हितचिंतक यांना कंत्राटे दिली जात होती. कायदेशीर कारवाईपासून त्यांच्या निकटवर्तीयांना वाचवले जात होते. माध्यमांचे व अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावापुरते होते. सर्व महत्त्वाच्या माध्यमांवर व्हुचिच व त्यांच्या गटातील बड्यांचे नियंत्रण होते. जनता व विशेषत: युवक त्यांच्या एकाधिकारशाहीने संतप्त झाले होते. त्यातून ’स्टुडंट लिस्ट’ (ढोबळ अर्थ, विद्यार्थ्यांचा विजय) ही अराजकीय संघटना जन्मली. त्यांनी सर्व जागा लढवताना एकाही राजकीय व्यक्तीस उमेदवारी दिली नाही. शेतकरी, डॉक्टर, प्राध्यापक त्यांचे उमेदवार होते. व्हुचिच यांनी ’स्वतंत्र माध्यमां’वर आपल्या पराभवाचे खापर फोडले हे महत्त्वाचे आहे. लुला असोत किंवा स्टुडंट लिस्ट असो, दोघांपुढेही आव्हाने मोठी आहेत. उजव्या विचारांनी निर्माण केलेली सामाजिक दरी लुला यांना सांधावी लागेल. सर्बियात खरी लोकशाही प्रस्थापित करून देशाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. दोन्ही देशांनी कथित राष्ट्रवाद नाकारला आहे. विकासाच्या फसव्या दाव्यांना ते भुलले नाहीत. दोन्ही निवडणुकांचा हा अर्थ महत्त्वाचा आहे.
Related
Articles
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच ठार
07 Nov 2026
मनाचे हे खेळ सारे...
10 Nov 2026
बंगळुरूमध्ये कॅब चालकाने कुटुंब संपविले
07 Nov 2026
दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा
10 Nov 2026
अरुणाचलसह सहा राज्यांत एसएसआर
06 Nov 2026
देशाची प्रगती पाहण्यासाठी सोनियांनी ’इटालियन चष्मा’ काढून टाकावा
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)