E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
29 Oct 2026
देशापुढे कुपोषणाचे आव्हान
भारताने कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रांत प्रगती केली आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना भूकमारी आणि कुपोषणाची समस्या कायम असणे ही दुर्दैवी बाब आहे. 2026 च्या जागतिक भूक निर्देशांकातील भारताचे स्थान देशाच्या विकासाच्या दाव्यांचा गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडणारे आहे. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होत असतानाही अनेक नागरिकांना पुरेसे आणि सकस अन्न मिळत नसेल, तर ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेतील उणीव आहे. लहान मुलांमधील कुपोषणाची समस्या अधिक चिंताजनक आहे. कुपोषणाचा परिणाम मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासावरही होतो. भूकमारी दूर करण्यासाठी सरकारने केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंगणवाड्या, शालेय पोषण आहार आणि मातृ-बाल आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचतो की नाही, यावरही लक्ष ठेवले पाहिजे. देशाची खरी प्रगती उंच इमारती, मोठे प्रकल्प किंवा आर्थिक आकडेवारीत नसून प्रत्येक नागरिकाला दोन वेळचे पुरेसे अन्न मिळण्यात आहे. भारताला खर्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल, तर भूकमुक्त आणि कुपोषणमुक्त भारत घडविण्यासाठी सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची
सध्या ’सत्ता बदल’हा अजेंडा विरोधक देशांतर्गत शत्रू बाह्य शक्तींच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर कार्यरत करत आहेत. ही लढाई सीमेवरच्या लढाई पेक्षा जास्त धोकादायक आहे. देशांतर्गत सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 12 ठिकाणी प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक विभागातून 50 स्वयंसेवकाची निवड करून सैन्यदलाचे प्रशिक्षण देणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियामधून खोटे कथानक तयार करून जनतेला संभ्रमित करणे, अफवा पसरवणे या प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे अंतर्गत सुरक्षा धोकादायक बनते. अशावेळी आधुनिक प्रणाली, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक क्षमतेने सुसज्ज असलेल्या प्रणाली या साधनांचा वापर करणार्या नागरी संरक्षण दलाची आवश्यकता महत्त्वाची ठरते. या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो.
संध्या काटदरे, माणगाव, रायगड
दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर
राज्यात पावसाअभावी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. खेड्या -पाड्यात लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा-पाणी नाही. शेतातील खरीप वाळले, रब्बी शक्य नाही, कामकरी, कष्टकरी, मजूर, कामगार यांच्या हाताला काम नाही. ग्रामीण भागात राहणार्या गोर, गरीब, दुबळे व हातावर काम करून पोट भरणारे यांचे हाल पाहावत नाही. म्हणून ही मंडळी गाव सोडून भयावह परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहेत. त्यांच्या या स्थलांतरामुळे गावचे-गाव ओस पडत आहेत. ते ज्या ठिकाणी पोटा -पाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत, तेथेही पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट स्थिती आहे. शासनाने या स्थलांतरित नागरिकांचे स्थलांतर तात्काळ थांबविण्यासाठी ग्रामीण भागात हाताला काम, पिण्याला पाणी, जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करून दिल्यास हे स्थलांतर थांबेल व शहरी भागावर ताण पडणार नाही. शासनाने या साठी नियोजनबद्ध आखणी करण्याची गरज आहे.
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर.
युरोपात होरपळ वाढली
नेचर हेल्थ जर्नलच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2026 च्या उन्हाळ्याचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. 2022 हा आत्तापर्यंत सर्वांत तीव्र उन्हाळा गणला जात होता. त्यावेळी सुमारे 22000 हून अधिक लोकांचा मृत्यू उन्हाळ्यामुळे झाला होता. 2026 चा उन्हाळा सर्वांत तापदायक ठरला. यावेळी 50000 जास्त लोक मृत्युमुखी पडले. युरोपच्या दृष्टीने मे, जून व जुलै हे महिने अतिशय तापदायक ठरले. ही बातमी नुकतीच वाचण्यात आली. युरोपमधील 854 शहरात हे मृत्यू झाले आहेत. या मृत्यूपैकी सुमारे 32619 मृत्यू हे हवामानाच्या बदलामुळे झाले आहेत. संधोक्यांच्या मते या पेक्षाही जास्त मृत्यू असू शकतात. आपल्या भारतातील परिस्थिती सुद्धा वेगळी नाही. उन्हाळा तीव्रतेने वाढत आहे. पावसाळा कमी होत आहे. धो धो पाऊस पडत आहे. कोठे दुष्काळ तर कोठे अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टीला कारणीभूत ठरत आहे बदलते हवामान. विकासाच्या नावाखाली जंगल तोड होत आहे. विद्युत निर्मितीसाठी भूगर्भातील कोळसा प्रचंड प्रमाणात काढला जात आहे. रस्त्यांवरील वाहनांमुळे प्रचंड प्रमाणांत प्रदूषण होत आहे. नद्या प्रदूषित झाल्या आहेत. ही सारी कारणे हवामान बदलाची आहेत. हे असेच चालू राहिले तर मानवाचा विनाश अटळ आहे.
शांताराम वाघ, पुणे
Related
Articles
देवगड हापूसच्या एका पेटीला 41 हजारांचा दर
09 Nov 2026
तेव्हा सोनिया ‘एनडीए’साठी ’मतचोरी’ करत होत्या का ?
07 Nov 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनाच्या निर्बंधांवरून गोंधळ
05 Nov 2026
दहावी, बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ
05 Nov 2026
भारत-पोलंडचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
05 Nov 2026
विशेष मुलांच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला प्रतिसाद
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)