E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दडपून ठेवलेल्या सत्याला फुटली ’सत्याग्रह’ व्यासपीठातून वाचा
Wrutuja pandharpure
04 Oct 2026
राहुल गांधी यांचे मत
नवी दिल्ली
: सत्य दाबले गेले आहे. त्या सत्याला बाहेर काढण्यासाठी सत्याग्रह व्यासपीठ सुरू केले आहे. भविष्यात कोणालाही सत्य दाबता येणार नाही, याची मी जबाबदारी घेत आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्याग्रह डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या माध्यमातून विविध विषयांना वाचा फोडली जाणार असल्याचे सांगताना ते म्हणाले. सरकारविरोधात रोष या व्यासपीठावर नागरिकांनी व्यक्त करावा. नागरिकांचे सत्त्व दाबले गेले आहे. ते आता या व्यासपीठातून बाहेर येण्यास चालना मिळेल. ते म्हणाले, देशभरात नागरिक आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत आणि अनेकदा त्यांना हा लढा एकट्यानेच लढावा लागत आहे. ’जनरेशन झेड’, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, दलित, महिला या प्रत्येक संघर्षाची स्वतःची अशी एक कहाणी आहे. पण एकट्या व्यक्तीचा आवाज दाबणे अनेकदा सोपे असते. सर्व नागरिकांचे आवाज व्यासपीठाच्या माध्यमातून एका नकाशावर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महात्मा गांधींचा संदर्भ देत काँग्रेसचे खासदार म्हणाले, बापूंनी आपल्याला शिकवले की सत्य हेच आपले सर्वांत मोठे शस्त्र आहे. पण सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणे हे त्याहूनही मोठे शस्त्र आहे. जर तुम्हीही कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढा देत असाल, तर तुमची कहाणी नक्की सांगा.
Related
Articles
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
09 Oct 2026
जो इतिहास विसरतो, त्याचा र्हास होतो
08 Oct 2026
युद्धनौकांना मदत करणार्या जहाजाचे जलावतरण
06 Oct 2026
प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत रंगला हास्याचा ‘ऑल दि बेस्ट’‘
08 Oct 2026
सिंधू जल करार स्थगिती विरोधात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाकडे
04 Oct 2026
तिकोना किल्ल्यावर अंधारात मार्ग चुकलेल्या पर्यटकांची ’शिवदुर्ग रेस्क्यू टीम’कडून सुटका
04 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
आयोगाने विश्वासार्हता गमावली
5
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान