नवी दिल्ली : ’आप’च्या (आम आदमी पार्टी) राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्या गोष्टींचे समर्थन करणे अशक्य होते, त्यांचा बचाव करणे आता शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.राजीव शुक्ला, पवन खेडा आणि काँग्रेसच्य दिल्ली विभागाचेे प्रमुख देवेंद्र यादव यांसारख्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कक्कर यांनी उत्तर प्रदेशचे माजी आमदार श्याम सुंदर शर्मा आणि रजत राकेश टंडन यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे सरचिटणीस नसीर हुसेन यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की, कक्कर र या ’आप’च्या माजी मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या, श्याम सुंदर शर्मा हे उत्तर प्रदेशचे माजी आमदार आहेत, तर रजत राकेश टंडन हे स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम दास टंडन यांच्या कुटुंबातील आहेत. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत नागरिक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. आम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करतो.
Fans
Followers