E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सेमीकंडक्टर संशोधनाला उद्योग-शिक्षणाची जोड आवश्यक
Wrutuja pandharpure
04 Oct 2026
पुणे
: सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची भूमिका वेगाने विस्तारत असून, आगामी काळात या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी संशोधन, नवकल्पना आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत करावा. यामध्ये भारतीय अभियंत्यांचे योगदान उल्लेखनीय राहणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील अग्रणी ‘एनएक्सपी इंडिया’ संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी ’एनएक्सपी इंडिया’चे पुणे साइट हेड आशिष भट्टड, कंपनीचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी कंपनीतील विविध उत्पादनांची पाहणी करत सचिन पत्की आणी पुष्कर सुदामे यांच्याकडून माहिती घेतली. ’एनएक्सपी इंडिया’ ही ’एनएक्सपी सेमीकंडक्टर्स’ची भारतातील प्रमुख संशोधन, विकास व डिझाइन उपकंपनी आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन दशकांत ’एनएक्सपी इंडिया’ने ऑटोमोटिव्ह आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आज तंत्रज्ञान हा पर्याय राहिलेला नसून तो जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आशिष भट्टड म्हणाले, येत्या काळात एआय, ऑटोमोटीव्ह, कनेक्टीव्हीटी आणि सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमध्ये कंपनी आणखी मोठे योगदान देईल. वृषाली मोदी यांनी स्वागत केले. प्राची जोशी व देवयानी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश सबनीस यांनी आभार मानले.
Related
Articles
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
टिळक भवनात आदिवासी विद्यार्थ्यांना अटक
06 Oct 2026
मानापमानाच्या पलीकडचे समाधान
03 Oct 2026
पिके करपली, जमिनीला भेगा...
03 Oct 2026
पीएमआरडीएमध्ये नवी कार्यपद्धती; रस्त्यांच्या जोडणीसाठी एकसमान कार्यपद्धती
05 Oct 2026
ऊसतोड कामगारांवर बेरोजगारीचे संकट : तुळजापूरकर
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
आयोगाने विश्वासार्हता गमावली
5
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान