भारताला सलग दुसर्‍यांना विजेतेपद   

निशिन : आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटमध्ये भारताने दुहेरी यश मिळवले. प्रथम हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने पाकिस्तानवर मात करत सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे आशियाई स्पर्धेच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकत वर्चस्व कायम राखले.भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक जिंकले. 2023च्या हांगझोऊ आशियाडमध्येही ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक पटकावले होते. यंदा महिला संघानेही सुवर्णपदक जिंकल्याने क्रिकेटमधील दोन्ही सुवर्णपदके भारताच्या खात्यात जमा झाली. महिला संघानेही 2023मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे आशियाडमध्ये क्रिकेटमध्ये भारताने सलग दुसर्‍यांदा दोन्ही सुवर्णपदके जिंकली.
 
भारतीय पुरुष संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताने 20 षटकांत 6 बाद 211 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने 14 वर्षे जुना विक्रम मोडला. यापूर्वी 2012मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 192 धावा केल्या होत्या.भारताकडून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने अर्धशतके झळकावली. अभिषेकने 28 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांसह 61 धावांची आक्रमक खेळी केली. तिलकने 22 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 51 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 षटकांत 6 बाद 192 धावांपर्यंतच मजल मारता आली. नवाज अवघ्या चार धावांनी शतकापासून दूर राहिला. त्याने 51 चेंडूंत 96 धावांची खेळी केली.

Related Articles