E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाले; वैमानिक मच्छार यांची भावना
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
नवी दिल्ली : मी हनुमंताचा भक्त आहे. संकट काळात मी नेहमी हनुमान चालिसाचे गायन करत आलो आहे. त्यामुळे मला जीवनात मोठे धैर्य मिळाले, अशी भावना वैमानिक स्मित मच्छार यांनी व्यक्त केली. स्वत:च्या प्राणाची बाजी लावून १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे स्मित मच्छार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संवाद साधला. त्या वेळी मच्छार बोलत होते.
मच्छार यांनी सांगितले की सह-वैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतर, प्रवाशांचा जीव वाचविण्याचा दृढ निश्चय केला होता. शरीरात उरलेल्या त्राणाचा अधिकाधिक वापर केला आणि विमान पडण्यापासून रोखले. सध्या दुबईत मच्छार यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुबई ते इस्रायलची राजधानी तेलअविव असा प्रवास करणारे फ्लायदुबई विमान फ्लाइट एफझेड १०७३ च्या कॉकपिटमध्ये तीन दिवसांपूर्वी (बुधवारी) चाकू हल्ल्याची घटना घटना घडली होती.. हल्ल्यानंतर मी स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण, अशा संकटातही प्रवाशांचा जीव वाचवायचा आहे, याचे मला भान होते. डोळे मिटले असताना विमानातील हालचालीवर लक्ष होते. एका क्षणी विमान खाली जात असल्याची जाणीव झाली. हल्ल्यात जखमी झालो असताना मी निश्चय केला की आता उठायचे आहे. तशी मनाशी खूणगाठ बांधली आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर अन्य प्रवासी मदतीस धावले. त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी होती. गेली सतरा वर्षे विमाने उडवत आलो आहे. त्यामध्ये ११ वर्षे कॅप्टन म्हणून काम केले. मोदी म्हणाले, मच्छार यांनी क्षणात निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेमुळे असे स्पष्ट झाले की, भारतीय हे जीव घेणारे नाहीत, तर इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची बाजी लावणारे आहेत.
हल्ला करणारा वैमानिक दहशतवादी : डोनाल्ड ट्रम्प
वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर चाकू हल्ला करणारा वैमानिक हा ओमान देशाचा रहिवासी आहे. झटापटीत तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो एक दहशतवादी असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले असून त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
Related
Articles
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
पेपरलेस कारभारात पिंपरी-चिंचवड महापालिका नापास
07 Oct 2026
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज
08 Oct 2026
हा मूर्खपणा थांबवा...
13 Oct 2026
वर्षा विगत,शरद ऋतु आयी...
11 Oct 2026
गंगेच्या तळाशी दडलेले विष
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचे निधन
4
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
5
महागाईचा रेटा (अग्रलेख)
6
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी