E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मथुरेत धातूंची शुद्धता तपासण्यासाठी यंत्रे
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
मथुरा : येथील श्री कृष्ण जन्मसंस्थान सेवा संस्थानने देणगीदारांकडून देण्यात येणार्या मौल्यवान धातूंची शुद्धता तपासण्याचे यंत्र बसविले आहे. संगणकीकृत यंत्राद्वारे देणगीत दिलेला धातू शुद्ध आहे की नाही ? याचा तपास करणे आता सोपे झाले आहे. तसेच देणगी प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होण्यास चालना मिळाली आहे.
सेवा संस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी सांगितले की, यंत्र २० प्रकारच्या धातूंची शुद्धता तपासू शकते. नवरात्रीला ११ ऑक्टोबरला प्रारंभ होत आहे. त्या दिवसांपासून ते कार्यन्वित केले जाईल. भाविकांच्या उपस्थितीत शुद्धता चाचणी केली जाणार आहे. देणगी मिळाल्याची पावतीसोबतच त्या चाचणीचा अहवाल त्वरित दिला जाईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. देणगीदाराला अहवालावर सही करावी लागेल, ज्यावर भक्ताचा मोबाईल फोन नंबरही असेल. अहवालाची एक प्रत सेवा संस्थेच्या अभिलेखागारात जतन केली जाईल, असे ते म्हणाले. या यंत्राला धातू तोडण्याची गरज भासणार नाही आणि ते मूळ स्वरूपातच त्याची शुद्धता तपासू शकेल, असे शर्मा म्हणाले. हुंडी किंवा दानपेट्यांमध्ये मिळालेल्या सर्व धातूंच्या देणग्यांची मोजणी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली केली जाईल.
मोजणी कक्षात सीसीटीव्हीची नजर
देणग्यांच्या मोजणीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी मंदिर ट्रस्टने आधीच अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत मोजणी कक्षातील हालचाली रेकॉर्ड करण्यास सक्षम अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ही मोजणी कामगार, सुरक्षा रक्षक आणि स्वतंत्र निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाते, तर सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सहा महिन्यांसाठी जतन केले जाते, असे शर्मा यांनी पुढे सांगितले.
Related
Articles
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी जाहीर
05 Oct 2026
एकमताने किंवा बहुमताने न घेतलेले निर्णय रद्द करण्याचे संकेत
06 Oct 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मदत कक्ष; विद्यापीठांत कृती समित्या
07 Oct 2026
वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल अध्यक्षाचा शौर्य पुरस्कार
09 Oct 2026
भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट
03 Oct 2026
फॉर्म ६ मधील कोणत्याही बदलांना मान्यता दिलेली नाही
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान