महामार्गाच्या फलकावर हिंदीतील माहितीमुळे अधिकारी निलंबित   

तामिळनाडू सरकारची कारवाई

चेन्नई : महामार्गावरील मार्गदर्शक फलकांवर गावांची नावे हिंदीतून दिल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारने दोन अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. तुतीकोरीन जिल्ह्यातील सत्तनकुलम-नाझरेथ राज्य महामार्गावर (एसएच-९३) नव्या फलकावर तामिळ आणि इंग्रजी व्यतिरिक्त शहरांची नावे हिंदीमध्येही कोरण्यात आली होती.
 
राज्य सरकारने द्विभाषा धोरणानुसार महामार्गावरील फलकांवर तामिळ आणि इंग्रजीतच माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, हिंदीतही माहिती दिली होती, त्यामुळे अधिकार्‍यांवर कारवाई केली होती. आता हिंदी शब्द हटविले असून महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता दर्जाच्या अधिकार्‍यांविरोधात विभागीय कारवाई केली, असे सरकारकडून सांगण्यात आले. 
 

Related Articles