E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एसआयआर नोटीस आली? घाबरू नका...
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
बीएलओ घरी येऊन स्वीकारणार कागदपत्रे
पुणे
: मतदार यादीतील नोदींमध्ये विसंगती आढळल्याने किंवा जुन्या मतदार यादीशी नोदींची जुळवणी न झाल्याने एसआयआरची नोटीस मिळालेल्या मतदारांना दिलासा मिळाला आहे. अशा मतदारांना कागदपत्रे देण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नसून, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. मतदारांच्या विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) प्रकियेअंतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ऑनलाइन सुविधेचा वापर करू इच्छिणार्या नागरिकांना ‘वोटर हेल्पलाइन’ अॅपद्वारे नाव शोधणे, नवीन नोंदणी आणि तपशील दुरुस्तीसाठी अर्ज करता येतील. एसआयआर, नोटीस, नोंदणी किंवा विशेष शिबिरांबाबत मार्गदर्शनासाठी १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
विशेष शिबिरांचे आयोजन
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये बीएलओ उपस्थित राहणार असून,
प्रारूप मतदार यादीतील नावाची पडताळणी करता येईल. नवीन नोंदणीसाठी नमुना ६, तर मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी नमुना ८ भरता येणार आहे. नोटीसधारक मतदारांची आवश्यक कागदपत्रेही येथे स्वीकारली जातील.
पात्र विद्यार्थ्यांसाठीही नोंदणी मोहीम
कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने आणि विविध संस्थांमधील पात्र नागरिकांची नोंदणी वाढविण्यासाठीही १२ ऑक्टोबरपर्यंत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा!
३ व ४ ऑक्टोबर - सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे
५ ते ९ ऑक्टोबर - कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी
१० व ११ ऑक्टोबर - सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे
१२ ऑक्टोबर - दावे व हरकती दाखल करण्याची वाढीव मुदत; औद्योगिक आस्थापनांमध्ये मतदार जागृती व विशेष नोंदणी उपक्रम
नागरिकांनी आता काय करावे?
- प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि तपशील तपासा.
- नोटीस मिळाली असल्यास ती दुर्लक्षित करू नका; संबंधित बीएलओशी संपर्क साधा.
- नोटिशीतील कारणानुसार आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
- नवीन नोंदणीसाठी नमुना ६, तपशील दुरुस्तीसाठी नमुना ८ भरा.
- विशेष शिबिरे किंवा उपलब्ध ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्या.
- अधिक माहितीसाठी १९५० वर संपर्क साधा
जिल्ह्यातील कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन आवश्यक कार्यवाही करीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बीएलओशी संपर्क साधावा आणि वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा.
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Related
Articles
जुन्नर-आंबेगावमध्ये दुष्काळसदृश स्थिती
05 Oct 2026
यूपीआय शुल्काचे नियम समजून घ्या!
09 Oct 2026
पवना धरण तुडुंब तरीही पिंपरी-चिंचवडच्या ३४ सोसायट्यांना टँकरचा आधार!
05 Oct 2026
पर्यावरण संदेश घेऊन वसुंधरा दिंडी नागपूरहून सोलापुरात
07 Oct 2026
‘एमपीएससी’ आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा
07 Oct 2026
नागरिकांचा दाबलेल्या सत्याला ’सत्याग्रह’व्यासपीठातून वाचा
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान