E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पितृ पंधरवाड्यामुळे फळभाज्यांना मागणी वाढली
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
पुणे
: दरवर्षी पितृ पंधरवड्यात विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढत असते. यंदाही श्राद्धासाठी लागणार्या फळभाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे गवार, भेंडी, चवळीच्या शेंगा, कारली, काकडी आणि घोसावळे या फळभाज्यांच्या दरात १० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी असेपर्यंत वाढलेले दर कायम राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ आणि श्री शारदा गजानन आडते असोसिएनचे अध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातील दरातही वाढ झाली आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाज्यांना मिळणारा दर कमीच आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत पंधरवडा असणार आहे. तोपर्यंत फळभाज्यांना वाढलेली मागणी कायम असणार आहे. शहरासह किरकोळ, उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांसह घरगुती ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी करण्यात येत आहे. शुक्रवारी मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात ७० ते ८० गाड्या भाज्यांची आवक झाली. ही आवक जिल्ह्यासह पुणे विभागातून होत आहे.
या पंधरा दिवसांत घरातील दिवंगत वाडवडिलांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या नावाने जेवण घातले जाते. विशेष म्हणजे या भोजनात ठराविक भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे या भाज्यांना मागणी वाढत असते. त्यामुळे दरातही वाढ होते. यंदा कमी पावसामुळे भाज्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
मागणीप्रमाणेच भाज्यांची आवक
पितृ पंधरवडा सुरू झाल्यानंतर दरवर्षी काही फळभाज्यांना मागणी वाढत असते. यंदा ही मागणी कायम आहे. मागणी लक्षात घेऊन शेतकरी या भाज्या विक्रीसाठी बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवकही होत आहे. मागणी असल्यामुळे भाज्यांना दरहीं चांगला मिळत आहे.
- अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन
भाज्यांचे किरकोळ बाजारातील किलोचे दर
भाजी
दर
गवार
१२० ते १३० रूपये
भेंडी
११० ते १२० रूपये
चवळई शेंग ७० ते ८० रूपये
कारली
६० ते ८० रूपये
काकडी
५० ते ६० रूपये
घोसावळे
८० ते १०० रूपये
Related
Articles
दुष्काळामुळे शिरूरमध्ये बैलपोळा साधेपणाने
11 Oct 2026
जिबूतीजवळ बोट उलटून १०९ जणांचा मृत्यू
12 Oct 2026
मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप
13 Oct 2026
ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा
08 Oct 2026
नायजेरियात लष्करी तळावर बंडखोरांचा हल्ला; १० सैनिकांचा मृत्यू
09 Oct 2026
आठवडाभरात मिरच्यांच्या दरात 20 रुपये वाढ
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात