E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विनर्स अकादमीची मिळकत अखेर सील
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
आळंदी नगरपरिषदेची कारवाई; आवश्यक व्यवसाय परवाना व ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास
आळंदी
, (वार्ताहर) : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विनर्स अकादमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने शहरातील कोचिंग क्लासेस व विविध आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान विनर्स अकादमीच्या मिळकतीवर कारवाई करत नगरपरिषदेच्या पथकाने संबंधित इमारत सील केली.
आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले.नगरपरिषदेच्या अभिलेखांची तपासणी केली असता सदर आस्थापनाने आवश्यक व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याची नोंद आढळून आली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात येत असून, आवश्यक परवानग्या, नियमांचे पालन आणि सुरक्षिततेच्या बाबी तपासल्या जात आहेत.नगरपरिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे आणि नगरपरिषदेच्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
Related
Articles
डेन्मार्क ओपन स्पर्धा
13 Oct 2026
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये 15 जणांचा मृत्यू
11 Oct 2026
‘इंडिया’ आघाडीचे राजघाटवर आंदोलन
09 Oct 2026
ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ला
14 Oct 2026
सर्वोच्च न्यायालयावर ‘इंडिया’ आघाडीचा मोर्चा
13 Oct 2026
मंगल कलश भरले; स्वच्छतेचा फज्जा
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात