E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
झोपडपट्टीवासीयांनी भरला साडेबारा लाख ऑनलाईन सेवाकर
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
पालिकेकडून सहा महिन्यात वसुली
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये झोपडपट्टी सेवा कर संकलनासाठी ऑनलाइन सुविधेचा प्रभावी वापर करण्यात येत असून, झोपडपट्टीवासीयांचा या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ऑनलाइन माध्यमातून 422 पावत्यांद्वारे 12 लाख 49 हजार 762 रुपयांचा सेवा कर जमा झाला आहे.
तर 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून एकूण 831 पावत्यांद्वारे 26 लाख 15 हजार 271 रुपयांचा झोपडपट्टी सेवा कर महापालिकेकडे जमा झाला आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेने यंदा सेवा कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये ऑनलाइन सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन सुविधेमुळे कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारी ठरली. ऑनलाइन पद्धतीने कर भरणार्यांची संख्या वाढत असून, नागरिकांना डिजिटल माध्यमातून सेवा कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
पहिल्या सहामाहीची विक्रमी वसुली
झोपडपट्टी सेवा कर संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा विस्तार, नागरिकांमध्ये जनजागृती, कर भरण्यासाठी उपलब्ध सुविधांची माहिती पोहोचविणे तसेच थकबाकी वसुलीचा नियमित आढावा घेण्यावर झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून विशेष भर देण्यात आला. त्यामुळे यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी वसुली झाली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 25 लाख 37 हजार 248 रुपये, 2023-24 मध्ये 25 लाख 27 हजार 388 रुपये, 2024-25 मध्ये 10 लाख 14 हजार 967 रुपये वसुली झाली होती. तर यावर्षी म्हणजेच 2026-27 च्या पहिल्या सहामाहीत 26 लाख 15 हजार 271 रुपयांचा सेवा कर जमा झाला आहे.
महिला सक्षमीकरणाला चालना
महिला बचत गटातील महिलांमार्फत झोपडपट्टी सेवा कराची बिले वाटप करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये सेवा कर भरण्याबाबत जनजागृती होत असून, झोपडपट्टीतील महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.
झोपडपट्टी सेवा कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा विस्तार, करदात्यांमध्ये जनजागृती आणि थकबाकी वसुलीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. पहिल्या सहामाहीत झालेली 26 लाख 15 हजार रुपयांची वसुली ही या प्रयत्नांना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आहे. करदात्यांना सुलभ पद्धतीने सेवा कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत वसुली प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका
झोपडपट्टी सेवा कर भरण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महापालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना घरबसल्या सेवा कर भरणे शक्य झाले आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी आवश्यक जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Related
Articles
दाते मुद्रणालयाला महापौरांच्या आदेशाने टाळे
08 Oct 2026
घट स्थापनेसाठी पूजेच्या साहित्याला मागणी
11 Oct 2026
नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या
08 Oct 2026
10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात उदयवीरचा सुवर्ण ’नेम’
12 Oct 2026
आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धा
09 Oct 2026
मंगळवेढ्यातील २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात