जिल्हाधिकार्‍यांकडून दुष्काळाची पाहणी   

मंगळवेढा, (वार्ताहर) : दुष्काळात जनावरे जगण्यासाठी चार्‍याचा प्राधान्याने विचार करावा, चारा डेपो किंवा चारा छावणी ऐवजी छावणीतील जनावरांना दिल्या जाणार्‍या अनुदानाइतकी रक्कम महाडिबीटीवरून शेतकर्‍याच्या थेट बँक खात्यावर द्यावी, अशी मागणी लेडवे चिंचाळे येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकीकेयन यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी गणेशवाडी, आंधळगांव, लेंडवे चिंचाळे, शिरसी या गावांनी भेटी देऊन करपलेल्या पिकांची पहाणी केली.
 
जिल्हाधिकारी एस. कार्तिकीकेयन यांनी गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे आणि शिरसी या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. त्या दौर्‍यात शेतकर्‍यांशी संवाद साधला असता शेतकर्‍यांनी ही मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ आदीसह या भागातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली असता शेतकर्‍यांना पेरणी कधी झाली. याबाबतची विचारणा केली असता शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी केली, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे काही हाताला लागले नाही. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बीचा पाऊस पडेल या आशेवर फण पाळी करून ठेवली. 
 
त्यामुळे पंचनामे करताना आम्ही काय दाखवायचे वस्तुस्थिती बघून पंचनामे करावेत, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली असता जिल्हाधिकारी सरसकट पंचनामे करण्याचे सूचना कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या टँकरची माहिती घेत मागणीप्रमाणे आवश्यक ते टँकरच्या खेपा सुरू करण्याच्या सूचना देखील दिल्या. पशुपालकांनी जनावरांचा चार्‍याचा विचार करून जर छावणी सुरू केली छावणीतील शेडनेटमध्ये गोट्यातील जनावरे तग धरत नाहीत शेडनेट मधून 50 टक्के ऊन येत असल्यामुळे ही जनावरे दगावण्याची शक्यता आहे. 

Related Articles