E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कोपर्डी अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाकडून घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी
Wrutuja pandharpure
03 Oct 2026
कर्जत
, (वार्ताहर) : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी अत्याचार व हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती एच. डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सकाळी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली अपिले आणि शिक्षेच्या पुष्टीकरणासंदर्भातील कार्यवाही सुरू असताना न्यायालयाने ही स्थानिक पाहणी केली.
न्यायालयाच्या अधिकृत वाहनातून दोन्ही न्यायमूर्ती कोपर्डी येथे दाखल झाले. त्यानंतर संबंधित अधिकारी व सरकारी पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी घटनास्थळ आणि परिसराची पाहणी केली. प्रत्यक्ष घटना घडलेली जागा, आजूबाजूचा परिसर, रस्त्यांची स्थिती, साक्षीदारांची संभाव्य ठिकाणे तसेच घटनाक्रमाशी संबंधित अन्य जागांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान न्यायमूर्तींनी संबंधित अधिकार्यांकडून विविध बाबींची माहिती घेतली.
या प्रकरणातील साक्षीदारांनी आरोपींच्या हालचाली पाहिल्याचे न्यायालयासमोर सांगितले आहे. मात्र, साक्षीदार ज्या ठिकाणी होते, तेथून संबंधित रस्ता किंवा आरोपींच्या हालचाली प्रत्यक्ष दिसणे कितपत शक्य होते, याबाबत न्यायालयासमोर काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे घटनास्थळाची प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.न्यायालयाच्या आदेशानुसार, पीडितेची सायकल एका ठिकाणी सापडली होती, तर तिचे कपडे विरुद्ध दिशेच्या शेतात आढळले होते. या ठिकाणांमधील अंतर, परिसराची रचना आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांशी प्रत्यक्ष परिस्थितीचा मेळ घालण्यासाठी न्यायालयाने घटनास्थळी पाहणी केली.
पाहणीवेळी प्रकरणाच्या तपासाशी संबंधित तत्कालीन पोलीस अधिकारी बाजीराव गवारे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे उपस्थित होते. त्यांनी न्यायमूर्तींना प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळ व घटनाक्रमाची माहिती दिली.यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार शिरसागर, कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
भारतीय मसाल्यावरील आयात शुल्कात कपातीची अमेरिकन व्यापार्यांना आशा
08 Oct 2026
भारतातील भूजलात सतत घट
05 Oct 2026
विठ्ठल मंदिर समितीकडून दुष्काळाग्रस्तांसाठी मदतीचा हात
09 Oct 2026
पदकविजेत्या मुष्टियोद्ध्यांचे जल्लोषात स्वागत
05 Oct 2026
डाळिंबाचा ट्रक चालकांनीच पळवला
05 Oct 2026
हिंजवडी मेट्रोच्या आठ स्थानकांना जोडणार 21 अंतर्गत रस्ते
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान