E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी नव्हे, तर चांगला नागरिक घडविणे
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
डॉ. गीताली टिळक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सांगली : शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळविणे नसून ज्ञान, कौशल्य आणि मूल्यांच्या माध्यमातून चांगला नागरिक घडविणे तसेच समाजासाठी योगदान देण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. उच्च शिक्षण, संशोधन आणि भविष्यातील करिअरच्या संधींबरोबरच विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेत ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी केले.
श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल तसेच अभिजीत दादा कदम कनिष्ठ महाविद्यालय, पलूस येथे डॉ. गीताली टिळक यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, डिजिटल वर्गखोल्या आणि प्रयोगशाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहितीही त्यांनी शिक्षकांकडून घेतली. शैक्षणिक संचालिका तथा नगराध्यक्षा संजीवनी सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. टिळक यांचे स्वागत केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी-पुदाले, उपाध्यक्ष अनिल कदम, सचिव सुहास आनंदराव पुदाले, खजिनदार ईश्वर सिसाळ, संचालक पांडुरंग पुदाले, जगन्नाथ पुदाले, सतीश पवार, महेंद्र माने, प्राचार्य जी. बी. डुबल, समन्वयक बंदिनी देशमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर डॉ. टिळक यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. आधुनिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षण, भविष्यातील करिअरच्या संधी, संशोधनाचे महत्त्व, आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी आपुलकीने उत्तरे दिली.विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ परीक्षेच्या दृष्टीने न पाहता जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलतेने ज्ञान मिळवावे, असेही डॉ. टिळक यांनी सांगितले.
यावेळी दैनिक दक्षिण महाराष्ट्र केसरीचे व्यवस्थापक मनोहर पेशवे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली परिसर प्रमुख डॉ. माधवी पेशवे, दैनिक दक्षिण महाराष्ट्र केसरीचे जाहिरात व्यवस्थापक डॉ. हेमंत मोरे, वरिष्ठ उपसंपादक श्रीहरी महिंद्रकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली परिसर तसेच दैनिक केसरीचे पलूस प्रतिनिधी यशवंत कदम उपस्थित होते.संजीवनी सूर्यवंशी यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भविष्यात मोठी ध्येये गाठण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Related
Articles
काळ्या समुद्रात पुन्हा जहाजावर हल्ला
08 Oct 2026
पिंपरगणे परिसरात निसर्गसौंदर्याचा नजराणा
09 Oct 2026
दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य
09 Oct 2026
कॅप्टन स्मितच्या शौर्याने भारताचा जगभर गौरव !
08 Oct 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी सीजेपीचा पुन्हा अर्ज
13 Oct 2026
धामणी येथील खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात