E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्ण
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
नागोया : भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यात चीनचा १-० असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताने १९८२ नंतर प्रथमच आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असून, महिला हॉकीतील ४४ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपला आहे. या विजयासह भारतीय महिला हॉकी संघाने २०२८ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली.
भारतीय संघाने पहिल्या सत्रात आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती कायम राखली. भारताने चीनविरुद्ध पहिल्या क्वार्टरपासूनच आक्रमक खेळ केला. सहाव्या मिनिटाला बलजीत कौरला ग्रीन कार्ड मिळाले. मात्र, भारताने चीनवरील दबाव कायम ठेवला. भारतासाठी आपला २००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्या लालरेमसियामीने १०व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, आघाडी दुप्पट करण्यात अपयश आले. पहिला क्वार्टर संपेपर्यंत भारताने आघाडी कायम ठेवली. दुसर्या क्वार्टरमध्ये चीनने आक्रमक खेळ करत भारतावर सातत्याने दबाव टाकला.
चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाल्याने त्यांच्यासमोर बरोबरी साधण्याची मोठी संधी होती. मात्र, भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाने दमदार बचाव करत चीनला बरोबरी साधू दिली नाही.
त्यानंतरही चीनचे आक्रमण सुरूच राहिले. परंतु, भारतीय बचावफळीने शानदार खेळ करत चीनचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. भारत दुसर्या क्वार्टरमध्ये अधिक बचावात्मक पद्धतीने खेळत होता. मध्यंतरापर्यंत भारत १-० ने आघाडीवर होता. याचदरम्यान २८व्या मिनिटाला वेन डानला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतल्यानंतरही भारतासमोर चीनचे सातत्याने होणारे आक्रमण रोखण्याचे आव्हान होते. भारतीय खेळाडूंनी बचावात शानदार कामगिरी करत चीनचे प्रत्येक आक्रमण निष्फळ ठरवले आणि अखेरपर्यंत आघाडी कायम राखली. सामन्याच्या अखेरच्या काही मिनिटांत चीनने रणनीती बदलत आपल्या गोलरक्षकाला मैदानाबाहेर बसवले आणि अतिरिक्त आक्रमक खेळाडू मैदानात उतरवला. मात्र, त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली नाही. भारताने अखेरच्या टप्प्यात बचावासोबतच आक्रमणावरही भर दिला. अंतिम शिट्टी वाजताच भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला. लालरेमसियामीचा एकमेव गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरला. भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आणि अखेर ४४ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी ठरला.
आशियाई स्पर्धेत महिला हॉकीचा प्रथमच समावेश १९८२ मध्ये दिल्ली येथे झाला. त्याच स्पर्धेत भारताने एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारताने १९९८ आणि २०१८ मध्ये अंतिम फेरी गाठली; मात्र अनुक्रमे दक्षिण कोरिया आणि जपानकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत २८ सामने झाले आहेत. त्यापैकी चीनने १२, तर भारताने ११ सामने जिंकले आहेत. पाच सामने बरोबरीत सुटले आहेत.
Related
Articles
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
व्हाट्सऍप कट्टा
04 Oct 2026
दहशतवादी कारवायांतील आरोपी गुन्हेगार घोषित
08 Oct 2026
भारतातील भूजलात सतत घट
05 Oct 2026
भाजपचे राज्यसभेसाठी आठ उमेदवार जाहीर
06 Oct 2026
सेन्सेक्स कोसळला
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान