दक्षिण कोरियाकडून भारताचा ५-१ ने पराभव   

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष रिकर्व्ह सांघिक सुवर्णपदकाच्या लढतीत भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाने भारताचा ५-१ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. यशदीप भोगे, धीरज बोम्मदेवरा आणि नीरज चौहान यांच्या भारतीय त्रिकुटाने एका सेटमध्ये बरोबरी साधली, तर कोरियाने दोन सेट जिंकत सामना खिशात घातला.

तिसर्‍या सेटमध्ये सामन्याचा निकाल

दक्षिण कोरियाने तिसर्‍या सेटमध्ये ५६ गुण मिळवले, तर भारताला ५४ गुणांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कोरियाला दोन सेट गुण मिळाले आणि त्याने ५-१ असा विजय मिळवत सुवर्णपदक निश्चित केले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांनी ५६-५६ अशी बरोबरी साधल्याने प्रत्येकी एक सेट गुण मिळाला. दुसर्‍या सेटमध्ये कोरियाने ५७ गुण मिळवत भारताच्या ५० गुणांवर विजय मिळवला आणि दोन सेट गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये ५६-५४ अशी बाजी मारत दक्षिण कोरियाने भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगवले.
 

Related Articles